कोणतीही परिस्थिती तुम्हाला यशापासून थांबवू शकत नाही:रेशमा पुणेकर

By : Polticalface Team ,16-01-2024

कोणतीही परिस्थिती तुम्हाला यशापासून थांबवू शकत नाही:रेशमा पुणेकर लिंपणगाव (प्रतिनिधी)-- सहकार महर्षी स्व. शिवाजीराव नारायणराव नागवडे तथा बापू यांच्या ९० व्या जयंती दिनाचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते स्व. नागवडे बापू प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानमालाही याच कालावधीत संपन्न होत आहे. जिमखाना डे निमित्त दि.१६ जानेवारी २०२४ रोजी सुवर्ण कन्या भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार , शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या रेशमा पुणेकर आणि युवा नेते पृथ्वीराज बाबा नागवडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे उपस्थित होते. कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. अनेक यशस्वी खेळाडूंच्या कहाण्या आपण ऐकतो, परंतु परिस्थितीवर मात करून आपले भवितव्य घडवणारे खेळाडू हे प्रेरणादायी ठरतात, अशाच एका जिद्दी खेळाडूची कहाणी म्हणजे रेशमा पुणेकर. त्यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, लहानपणापासूनच मेंढ्यांच्या मागे काठी घेऊन धावले आणि आता थेट भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार झाली आहे. हा प्रवास अतिशय संघर्षमय होता. काठीने दगड मारण्याचा खेळ खेळणे, पण त्याच काठीच्या आकाराची स्लगर हातात घेवून कधी भारतीय संघाचा खेळाडू नव्हे, तर भारतीय संघाचा कर्णधार बनेल असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया रेश्मा पुणेकरन यांनी यावेळी व्यक्त केली. रेश्मा पुणेकर यांनी आजपर्यंत दोन आंतरराष्ट्रीय सामने, चीन आणि हाँगकाँग या देशात खेळले आहेत. आतापर्यंत एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २३ राष्ट्रीय सामन्यात त्यांनी महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व केलेले आहे. २८ राज्यस्तरीय सामने तसेच ४ गोल्ड मेडल, ६ रजत पदक, ३ कास्य पदक आणि महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्राप्त केलेला आहे. त्यांनी हॉंगकॉंग, चिनसारख्या अनेक देशात जाऊन दोन वेळा एशियन स्पर्धा खेळून आलेल्या आहेत. त्यांनी पुन्हा एकदा हॉंगकॉंग या देशात पार पडलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय महिला एशियन कप २०२३ या स्पर्धेत कर्णधार म्हणून नेतृत्व केले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना त्यांनी ती भेदून स्वतःचा खेळरुपी वलय निर्माण करणार्या त्या एक संघर्षशील, धैयशिल, कृतिशील आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. आज रेश्मा पुणेकर या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे शारिरीक शिक्षण विभागात एम. पी. एड ह्या वर्गात शिकत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शंकर गवते यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा.सतीश चोरमले यांनी करून दिली तसेच आभार प्रा.भगवान सोनवणे यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.