सहकार महर्षी बापू हे श्रीगोंदा तालुक्याचे महान कर्तुत्व संपन्न सतपुरुष होते- माजी संचालक दिलीपराव काकडे
By : Polticalface Team ,16-01-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू हे श्रीगोंदा तालुक्याचे महान सत्वशील कर्तुत्व संपन्न युगपुरुष होते. बापूंनी जिथे शिक्षणाची गैरसोय तिथे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची गंगा उभारली बापूंच्या या दूरदृष्टीमुळेच अनेक विद्यार्थी आज उच्च पदस्थ आहेत असे गौरवदगार नागवडे कारखान्याचे माजी संचालक दिलीपराव काकडे यांनी लोणी व्यंकनाथ येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांच्या 90 व्या जयंती सोहळ्यानिमित्त लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयाकडून दिवंगत शिवाजीराव नागवडे बापूंच्या प्रतिमेचे रथातून गावात प्रभात फेरीद्वारे बापूंना मानवंदना देण्यात आली. या प्रभात फेरीचे विद्यालयात आगमन झाल्यानंतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे हे होते. यावेळी व्यासपीठावर राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा, नागवडे कारखान्याचे माजी संचालक दिलीपराव काकडे, विलासराव काकडे, मोहनराव काकडे, पुरुषोत्तम लगड, गणपतराव काकडे, चेअरमन बाळासाहेब थोरात, अकबरभाई इनामदार, भाऊसाहेब डांगे, भगवानराव गोरखे, राहुल गोरखे, मा प्राचार्य बाळासाहेब शेंडे, विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते आधी यावेळी उपस्थित होते.
यावेळी राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा बापूंच्या कार्याला उजाळा देताना म्हणाले की, श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याला खऱ्या अर्थाने सहकार महर्षी बापूचं शिल्पकार लाभले बापूंनी तालुक्याच्या सर्वांगीण विकास केला. तालुक्याच्या विकासाची कुठेच उणीव भासू दिली नाही. त्यामध्ये सहकाराच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य माणसाचे जीवनमान फुलविले सहकारी साखर कारखानदारी संदर्भात राज्यातील अनेक दिगज नेतेमंडळी बापूंकडून मार्गदर्शन घेत होती. एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व म्हणून राज्यात बापूंची ओळख होती. निश्चितच बापूंनी दिलेले तालुक्यासाठी योगदान हे सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांचे कार्य सर्वांच्या सतत स्मरणात राहील असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे यावेळी म्हणाले की, सहकार महर्षी बापू हे तालुक्याचे दैवत होते. बापूंनी तालुक्यासाठी दिलेले योगदान हे शब्दात सांगणे कठीण आहे. एक कर्तृत्व संपन्न व सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून आजही तालुका बापूंची क्षणोक्षणी आठवण काढत असल्याचे गौरवदगार काकडे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते, माजी प्राचार्य बाळासाहेब शेंडे, आदींनी बापूंच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. यावेळी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक शिवाजीराव इथापे यांनी केले, तर आभार शिक्षक संतोष शिंदे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी