शिवाजीराव नागवडे यांचे कार्य दिपस्तंभासारखे तेजस्वी - प्राचार्य डॉ.गोविंद राजेनिंबाळकर
By : Polticalface Team ,17-01-2024
नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव( प्रतिनिधी) लोकनेते मा.आ.स्व. शिवाजीराव (बापू) नारायणराव नागवडे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त लोकनेते मा. आ.स्व. शिवाजीराव (बापू) नारायणराव नागवडे प्रतिष्ठान व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प मा.प्राचार्य डॉ.गोविंद राजेनिंबाळकर यांनी गुंफले.
प्रमुख व्याख्याते डॉ.जी.आर.राजेनिंबाळकर
यांनी "मी अनुभवलेले शिवाजीराव नागवडे (बापू)" या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी त्यांच्या व्याख्यानात बापूंचा सर्व जीवनपट उलगडला. बापूंनी लहान वयात मोठी व चिरकालीन टिकणारी स्वप्न पाहिली. शेतकरी व समाजाची असणारी जाणीव बापूंच्या संघर्षामागील मुख्य प्रेरणा होती. आपल्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन मोठी प्रगती करावी हे बापूंचे स्वप्न होते असे प्रतिपादन त्यांनी केले. या प्रसंगी प्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांनी गझलीच्याद्वारे अंतर्मनातील भावनांचा आविष्कार प्रतिबिंबित केला.
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी बापूंनी केलेल्या कार्याचा गुणगौरव करत,विचारांचा वसा आणि वारसा लाखमोलाचा असल्याने महाविद्यालय प्रगती करता आहे. असे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. बाबासाहेब भोस यांनी भूषविले. त्यांनी अध्यक्षीय भाषणात बापूंच्या शैक्षणिक, सामाजिक व सहकारातील संघर्षाचा लेखाजोखा थोडक्यात विषद केला.तसेच सामाजिक कार्यासाठी बापूंनी खुप वेळ व कष्ट दिले हे लाख मोलाचे आहे असे मत नोंदविले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.धर्मनाथ काकडे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.शंकर गवते यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.सुरेश रसाळ यांनी केले.सदर व्याख्यानमालेसाठी धनसिंग भोयटे, अशोक रोडे,विठ्ठलराव जंगले,भाऊसाहेब बरकडे,सुरेश पवार,शिवाजीराव फराटे,आबासाहेब शेळके,रत्नाकर गायकवाड व परिसरातील नागरिक उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थिनी,प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर वृंद उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी