पारगाव सुद्रिक शिवारात कुकडीच्या पाण्याचा मोठा अपव्यय, मात्र लिंपण गावचे अनेक शेतकरी अद्यापही आवर्तनापासून वंचित- निलेश कुरुमकर

By : Polticalface Team ,18-01-2024

पारगाव सुद्रिक शिवारात कुकडीच्या पाण्याचा मोठा अपव्यय,  मात्र लिंपण गावचे अनेक शेतकरी अद्यापही आवर्तनापासून वंचित- निलेश कुरुमकर लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यात गेल्या वीस पंचवीस दिवसापासून रब्बी हंगामाचे पहिले कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले. परंतु श्रीगोंदा तालुक्यात या कुकडीच्या पाण्याचा मोठा अपव्य होताना दिसत आहेत. आमच्या प्रतिनिधीने पारगाव सुद्रिक येथील 132 मायनर खाली असणाऱ्या चारीचे पाणी अक्षरशा ओढून आले व काटेरी झाडांमध्ये बेभामपणे वाहताना छायाचित्र टिपले आहे आहे त्यामुळे कुकडीच्या अधिकाऱ्यांचा आवर्तनाचा मोठा सावळा गोंधळ समोर येताना दिसला. एकीकडे शेतकरी रब्बी हंगामाच्या मुबलक पाण्याची अपेक्षा करत असताना या पाण्याचा मात्र श्रीगोंदा तालुक्यात अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मोठा अपव्य होताना दिसत आहे. ही बाब अत्यंत गंभीर दिसून येत आहे. दरम्यान लिंपणगाव येथील शेतकरी युवक नेते निलेश कुरुमकर यांनी मात्र कुकडीच्या पाण्याचे अधिकाऱ्यांकडून ढिसाळ नियोजन झाल्यामुळे लिंपण गावचे अनेक शेतकरी या रब्बी हंगामाच्या पहिल्याच आवर्तनापासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण कायम आहे. श्री निलेश कुरुमकर यांच्या म्हणण्यानुसार लिंपणगावकडे फक्त पाच ते सहा तास अधिकाऱ्यांशी संघर्ष करत आवर्तन सोडून पाणी तात्काळ बंद करण्यात आले. त्यामुळे लिंपणगावचे अनेक शेतकरी रब्बी हंगामाच्या पहिल्याच आवर्तनापासून वंचित राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार लिंपणगावची किसान पाणी वापर संस्था व अधिकाऱ्यांमध्ये आवर्तन कालावधीत समन्वय नसल्यामुळे शेतकऱ्यांना अपुरे पाणी सोडले त्यामुळे अनेकांची पहिल्याच आवर्तनात भरणी रखडल्याने शेतकरी आक्रमक बनले आहेत. या आवर्तनाच्या संदर्भात युवा नेते निलेश कुरुमकर यांनी कुकडीचे कार्यकारी अभियंता व उपविभागीय अधिकारी यांच्याशी उर्वरित शेतकऱ्यांना आवर्तने मिळावा म्हणून वेळोवेळी संपर्क केला, परंतु अधिकाऱ्यांनी मात्र या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप श्री कुरुमकर यांनी केला आहे.
निलेश कुरुमकर यांच्या म्हणण्यानुसार पाणी उशाला मात्र कोरड घशाला अशी अवस्था लिंपणगावच्या शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे. एकीकडे चालू वर्षी अत्यल्प पाऊस असल्याने आहे, त्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. शेतकरी कुकडीच्या आवर्तनाची प्रतीक्षा करत असताना पाणी आले आणि कधी गेले हे मात्र शेतकऱ्यांना कळालेच नाही, अशी स्थिती लिंपणगावच्या शेतकऱ्यांची निर्माण झाल्याचा आरोप निलेश कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
पाणी वापर संस्था व कुकडीच्या अधिकाऱ्यांच्या वादामध्ये मात्र पहिल्याच रब्बी हंगामाच्या आवर्तनाला शेतकऱ्याांना मोठा संघर्ष करावा लागला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पाणी वापर संस्थेच्या चेअरमनने आवर्तनाची मागणीच केली नाही तर पाणी वापर संस्थेची पाच लाखापर्यंत थकबाकी दिसून येते असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, तर चेअरमन च्या म्हणण्यानुसार आम्ही कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात येऊन पाण्याची रीतसर मागणी केली आहे. असे असताना संबंधित अधिकारेी मात्र शेतकरी आणि पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. असा गंभीर आरोप पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. वरील भरणी झाल्यानंतर लिंपणगावच्या वंचित शेतकऱ्यांना आवर्तन देऊ असे श्री वाळके यांनी सांगितले. परंतु सध्या पारगाव येथील फेरफटका मारल्यानंतर कुकडीचे पाणी बेफामपणे काटेरी झाडांमध्ये वाहताना दिसत आहेत. तेच पाणी लिंपणगावच्या शेतकऱ्यांना दिले असते तर उर्वरित शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला असता परंतु संबंधित कुकडीचे अधिकाऱ्यांनी लिंपणगावच्या चारीला तुटपुंजे पाणी सोडून अनेक शेतकरी आवर्तनापासून वंचित ठेवले आहे. वरील पाणी सोडताना मात्र पाण्याची आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोप देखील निलेश कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. या बेफिकराईमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा निलेश कुरुमकर यांनी केला असून, या नुकसान भरपाई बाबत अधिकारीच जबाबदार राहतील, असा आरोप निलेश कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. अधिकाऱ्यांना मात्र या प्रश्न आपण कुकडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशाराही निलेश कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष