श्रीगोंदा तालुक्याचे विकासरत्न दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू- नंदकुमार कुरुमकर

By : Polticalface Team ,18-01-2024

श्रीगोंदा तालुक्याचे विकासरत्न दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू-   नंदकुमार कुरुमकर    श्रीगोंदा तालुक्याच्या राजकीय इतिहासात कोणताही राजकारणातील वारसा नसताना अहोरात्र संघर्ष लढा देऊन सत्ता असेल तर सत्तेच्या माध्यमातून सत्ता नसेल तर संघर्ष करून घोड व कुकडी पाणी प्रश्न सहकार महर्षी बापूंनी सोडवला. व श्रीगोंदा सारखा दुष्काळी तालुक्यात खाजगी कारखाना सहकारी तत्त्वावर उभा केला, आणि तेथून पुढे खऱ्या अर्थाने श्रीगोंदा तालुक्याच्या विकास पर्वला सुरुवात झाली.
श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार सहकार महर्षी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सहकार व शिक्षण महर्षी दिवं. शिवाजीराव नागवडे बापू यांच्या 90 वी जयंती सोहळ्यानिमित्त सहकार महर्षी बापूंच्या सामाजिक शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकणारा दृष्टी लेख!
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू हे वांगदरी गावच्या सरपंच पदापासून एक एक पायरी चढत तालुक्याचे आमदार झाले. आणि पाहता पाहता तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले. खऱ्या अर्थाने बापूंच्या कर्तुत्वाचा तो क्षण अगदी मेहनतीचा व जिद्दीचा ठरला आणि तो यशस्वी देखील झाला. सहकार महर्षी बापूंनी स्वतःच्या गावचा विकास नव्हे तर संपूर्ण तालुका व जिल्ह्याच्या विकासासाठी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी घोड - कुकडी प्रकल्पाला वरिष्ठांच्या मदतीने गती दिली. दरम्यान सहकार महर्षी बापूंनी १९५२-५३ स. का. पाटील व मोरारजी देसाई यांच्या उपस्थितीत विसापूरला विशाल घोड - कुकडी परिषद घेऊन सरकारकडून मंजुरी मिळविली. 1956 रोजी घोडचे पाणी श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यात आज पर्यंत खेळवले. ते बापूंच्या अथक प्रयत्ना व दूरदृष्टीमुळेच सिद्ध होताना दिसते.
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ध्येयाने प्रेरित होऊन अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात अहोरात्र कष्ट करून पहिला श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना सहकारी तत्त्वावर 1973 रोजी सुरू केला. आणि यातूनच हजारो हातांना काम मिळाले. व एक- एक कुटुंब करता संपूर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला. त्यातून तालुक्याचा विकासाचा वेग अधिकच वाढला गेला.
सहकार महर्षी बापूंनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामध्ये 1980 रोजी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील पहिले इंदिरा गांधी तंत्रनिकेतन बेलवंडी शुगर येथे सुरू केले. त्याचबरोबर ग्रामीण भागातील मुला- मुलींच्या शैक्षणिक विकासासाठी श्रीगोंदा येथे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय 1982 रोजी सुरू केले. सहकार महर्षी बापूंनी जे कार्य हाती घेतले. तेच कार्य अखंडपणे चालू ठेवण्याच्या दृष्टीने पुढे ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था 1987 रोजी स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना शिक्षण मिळावे म्हणून गाव तिथे विद्यालय शिक्षण महर्षी बापूंनी स्थापन केले. आज एकूणच शैक्षणिक विकास पाहता तालुक्यामध्ये बापूंनी एक तंत्रनिकेतन, एक महाविद्यालय, चार कनिष्ठ महाविद्यालय, शिक्षण शास्त्र महिला महाविद्यालय व 21 ते 22 माध्यमिक विद्यालयांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याच्या शैक्षणिक विकास साधला गेला आहे.
सहकार महर्षी बापू हे श्रीगोंदा तालुक्याचे आमदार असताना तालुक्यामध्ये विकास कामांचा भला मोठा डोंगर उभा केला. रस्ते, वीज, पाणी प्रश्न, बंधारे, नालाबल्डींग असे अनेक प्रश्न प्राधान्यांनी सोडवले. भोसा खिंडीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला. त्याचबरोबर लहान मोठ्या उद्योगधंद्यांना तालुक्यात चालना दिली. आमदारकीच्या कालावधीत पदाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी न करता जनसामान्यांच्या विकासासाठी बापूंनी केला.
सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून प्रगतीचे एक एक पाऊल पुढे टाकत असताना शेतीसाठी काहीतरी जोडधंदा मिळावा यासाठी सहकार महर्षी बापूंची कायम तळमळ असे. शेतकरी कुटुंबाची आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावे. तसेच दूध धंदा शेतीस खऱ्या अर्थाने पूरक ठरावा, म्हणून सन 2001 रोजी श्रीगोंदा तालुका सहकारी दूध संघाची बापूंनी मोठ्या जिद्दीने स्थापना केली.
ज्याला कोणीच नाही वाली त्या शेतकऱ्यांचे बापू बनले हे कैवारी.

स्वतःला समाजकार्यात वाहून घेणाऱ्या सहकार महर्षी बापूंच्या सर्व सामाजिक कार्याचा आढावा घेता 1997 रोजी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटीच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सहकार महर्षी बापूंना विजयरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. बापूंचा स्वभाव हा अतिशय शांत व संयमी होता. खोटे आश्वासने देणे, त्यांच्या स्वभावात नव्हते. एखादे काम होण्यासारखे असेल तर हो म्हणणार, आणि होण्यासारखे नसेल तर स्पष्टपणे नाही म्हणणार कोणाला कधी आशेला लावून झुलवत ठेवणे त्यांना जमत नव्हते. तो त्यांचा पिंडच नव्हता. हाती घेतलेले काम अर्धवट सोडणे त्यांच्या स्वभावात बसत नव्हते. प्रत्येक बाबींचा निर्णय घेताना तो बापूंनी अत्यंत काळजीपूर्वक घेऊन त्यातून सर्वसामान्यांचे कष्ट करणाऱ्यांचे जास्तीत जास्त हित कसे जोपासले जाईल याकडे बापूंचा अत्यंत कटाक्ष होता. कार्य करत असताना बापूंनी जिद्द आणि चिकाटी कधी सोडली नाही. सत्तेपेक्षा सेवेला, संपत्ती पेक्षा संस्कृतीला, आणि सत्कार्यापेक्षा सतकार्याला महत्त्व देणारा नेता म्हणजे स्वर्गीय शिवाजीराव नागवडे बापू होत.
बापूंच्या नंतर त्यांचे कार्य पुत्र सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, दीपक शेठ नागवडे, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे हे नेटाने पुढे सहकाराची धुरा खांद्यावर घेत तालुक्याच्या हितासाठी रात्रंदिवस योगदान देत आहेत. त्यामुळे नागवडे कुटुंब आणि सहकार क्षेत्र व सर्वसामान्य माणूस हे नाते गेले सहा शतके अधिक दृढ झाल्याचे दिसते. सहकार महर्षी बापू हे सहकार क्षेत्रातील राज्यात ऋषितुल्य व्यक्तिमत्व व सहकाराचे उत्तम मार्गदर्शक म्हणून परिचित असल्याने देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी बापूंवर राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. बापूंनी ती अत्यंत सक्षमपणे चालवली. सहकार महर्षी बापूंनी आपले संपूर्ण आयुष्य तालुक्यातील जनतेच्या हितासाठी झिजविले आहे." "ज्योत स्वतः जळते पण दुसऱ्याचं प्रकाश देते" सहकार महर्षी बापूंनी तालुक्यात सहकार सिंचन व सांस्कृतिक क्षेत्रात दिलेले मोठे योगदान म्हणून" "दिव्यत्वाची जेथे प्रचिती तिथे कर माझे जुळती" सहकार व शिक्षण महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंना ९० व्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली व शतशः प्रणाम!
शब्दांकन पत्रकार
नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव
मो. नं. 9975018453

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष