राजेंद्र दादा नागवडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू -उपमुख्यमंत्री अजित दादा पवार

By : Polticalface Team ,20-01-2024

राजेंद्र दादा नागवडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू -उपमुख्यमंत्री अजित दादा पवार लिंपणगाव( प्रतिनिधी)- सहकार व शिक्षण महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंचा वारसा नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी खंबीरपणे चालवला असून, आपण निश्चित यापुढे राजेंद्र नागवडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सहकार महर्षी बापूंच्या 90 व्या जयंती सोहळ्याप्रसंगी बोलताना दिली.
श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते सहकार व शिक्षण महर्षी व विद्याभूषण लोकनेते शिवाजीराव नागवडे बापू यांचा 90 व्या जयंती सोहळा कारखाना कार्यस्थळावरील इंदिरा गांधी विद्या निकेतनच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे हे होते.
यावेळी सहकार महर्षी बापूंच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पुढे म्हणाले की, बापूंना आणि मला विधिमंडळात एकत्र काम करण्याची संधी मिळाली एक सहकाराचे दूरदृष्टी व खंबीर नेतृत्व असणारे शिवाजीराव नागवडे बापू यांनी श्रीगोंदा तालुक्याच्या जडणघडणीसाठी अहोरात्र परिश्रम घेऊन सहकार, शिक्षण, सिंचन क्षेत्रात त्यांनी नेत्रदीपक काम केले. असे सांगून ना. पवार पुढे म्हणाले की, नगर जिल्हा हा अतिशय संवेदनशील जिल्हा समजला जातो. सहकार क्षेत्राला या जिल्ह्याने राज्यात नव्हे तर संपूर्ण देशाला उत्तम प्रकारे दिशा देण्याचे काम या जिल्ह्यातील या थोर विभूतींनी दिलेले आहे. त्यामध्ये पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. राज्याच्या हितासाठी सहकाराची मुहूर्तमेढ या थोरमंडळींच्या बरोबरीने सहकार महर्षी बापूंनी देखील अविरतपणे सतत विकासाचा ध्यास घेत काम केले. विकासाच्या दृष्टीने बापूंनी आपला संपूर्ण राज्यात ठसा उमटविला आहे अशा या थोर नेत्याचे स्मरण करणे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे असे सांगून ना पवार पुढे म्हणाले की, श्रीगोंदा सारख्या या दुष्काळी तालुक्याच्या विकासात बापूंनी सत्तेत नसताना देखील सहकार, सिंचन, शिक्षण व कृषी क्षेत्रात भरीव काम केले. हे कोणीही नाकारू शकत नाही. असे सांगून नामदार पवार पुढे म्हणाले की, निश्चितच मी श्रीगोंदा तालुक्यातील आम सभासद व जनतेला व कारखााना प्रशासनाल धन्यवाद देतो की, या ऋषितुल्य नेत्याचा अभिमान वाटावा असा पुतळा कारखाना कार्यस्थळावर उभा करून प्रसंगी तरुण पिढीला देखील बापूंच्या कार्याचे स्मरण होणार आहे.
ना. पवार आणखी पुढे म्हणाले की, बापूंनी जे कार्य बहुजनांसाठी पार पाडले, तेच कार्य त्यांचे पुत्र नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे दीपक नागवडे व जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे या खंबीरपणे पुढे चालवत आहेत. श्रीगोंदेकरांनी देखील राजेंद्र नागवडे व सौ अनुराधाताई नागवडे यांना यापुढे खंबीर साथ द्यावी, आपण देखील श्रीगोंद्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सांगत ना. पवार आणखी पुढे म्हणाले की, सहकार महर्षी बापू हे एक वचनी निष्ठावंत कार्यकर्ते होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे ते देखील खंदे समर्थक होते. दादांचाही बापूंवर मोठा विश्वास होता. स्वतःच्या स्वकर्त्यातून बापूंनी आपला राजकीय प्रवास गावच्या सरपंच, आमदार ते राज्य साखर संघाच्या अध्यक्ष पदापर्यंत एक नेत्र दीपक प्रामाणिकपणे उत्तम प्रकारे काम केले. बापूंनी साखर कारखानदारी उभारल्यानंतर जीव ओतून काम केले. म्हणूनच आज श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याचा चेहरा मोहरा बदललेला आहे. याची आठवणही पवार यांनी उपस्थितींना करून दिली. त्यामुळे श्रीगोंदाच्या जनतेने यापुढे नागवडे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.
असे सांगून ना. पवार आणखी पुढे म्हणाले की, दिवसेंदिवस अत्यल्प पावसामुळे पाणी प्रश्न सर्वत्र निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे मोठमोठ्या धरणांमध्ये देखील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होतं आहे. त्यामुळे भविष्यात शेतीसाठी सर्वांनाच यापुढे धरणांमधून बंद पाईपलाईनद्वारे आता पाणी द्यावे लागणार आहे. तसा धोरणात्मक निर्णय राज्य सरकार देखील घेत आहे. हा निर्णय घेतला तरच आपले सर्वांचे संसार पुढे चालणार आहेत. जनतेची कामे झाली पाहिजेत, परंतु ते देखील दर्जेदार झाले पाहिजे, कमी प्रमाणात तशी कामे दिसतात. असे सांगून ना. पवार पुढे मिळाले की, मोदी सरकार देशात सर्व क्षेत्रात चांगले काम करत आहे. देश व राज्यात अनेक मोठमोठे प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत
ना. पवार आणखी पुढे म्हणाले की न्यायप्रविष्ट बाबीमुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या नाहीत. त्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणा संदर्भात बोलताना पवार पुढे म्हणाले की, मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकले पाहिजे, त्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून कायदेतज्ञांची सल्लामसलत करत निर्णय घेत आहे. असे सांगून सहकार महर्षी बापूंच्या कार्यकर्तृत्वावर नामदार अजितदादा पवार यांनी स्तुती सुमने वाहिली.
अध्यक्षीय भाषणात नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यावेळी म्हणाले की, बापूंनी दूरदृष्टी ठेवून सहकाराच्या माध्यमातून सिंचन व शिक्षण क्षेत्रात भरीव असे योगदान दिले हे तालुक्यातील जनतेला सर्वश्रुत आहे बापूंनी दूरदृष्टी समोर ठेवत तालुक्यात गावोगावी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून ज्ञानगंगा सुरू केली. त्यातून ग्रामीण भागासह अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुले उच्च पदस्थ बनले आहेत. शेतीला पाणी हवे म्हणून बापूंनी घोड कुकडी धरणाचे पाणी तालुक्याला मोठ्या संघर्षातून मिळविले. त्यामुळेच तुमच्या आमच्या जीवनामध्ये बदल झालेला दिसतो. तो केवळ बापूंच्या दूरदृष्टीमुळेच असे सांगून, श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की, आपणही तालुक्याच्या उर्वरित विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहोत. तालुक्यातील जनतेच्या प्रत्येक संकटात कारखान्याच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरोना कालावधीमध्ये रुग्णांसाठी जवळपास 300 बेडची सोय केली. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला या कालावधीमध्ये दहा हजार रुपयाची मदत केली. नामदार अजित दादा हे दूरदृष्टीचे नेते आहेत आमच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नासाठी सुपा आणि विसापूरला एमआयडीसी व्हावी अशी अपेक्षा श्री नागवडे यांनी व्यक्त करत तालुक्याच्या हितासाठी आगामी निवडणुकीत सौ अनुराधाताई नागवडे यांना उभे करणार असल्याचे सांगून उपस्थित मान्यवर व जनतेचे श्री नागवडे यांनी आभार मानले.
याप्रसंगी आमदार बबनराव पाचपुते यांनी आपल्या भाषणात विधानसभा निवडणुकीत बापू आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो, परंतु आमच्यामध्ये कधी मनभेद झाले नाहीत. पुन्हा आम्ही एक दिलाने एकत्र येत असत असे सांगितले.
या आयोजित सोहळ्यास आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सिताराम गायकर, दादा फराटे ,सौ अनुराधाताई नागवडे, दीपक नागवडे, दीपक शिर्के, सिद्धेश्वर देशमुख, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, ज्योती खेडकर, राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा, कैलासराव पाचपुते, स्मितल वाबळे, भगवानराव पाचपुते, शरद नवले, प्रा भाऊसाहेब कचरे, भगवान गोरखे, शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड व बी. के. लगड यांच्यासह नागवडे कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक तसेच बापूंवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते शेतकरी व विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी केले. सूत्रसंचालन शंकर गवते यांनी तर आभार संचालक सुभाषराव शिंदे यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.