लोकनेते स्वर्गीय शिवाजीराव नागवडे बापू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राजेंद्र प्रसाद विद्यालयात वकृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

By : Polticalface Team ,20-01-2024

लोकनेते स्वर्गीय शिवाजीराव नागवडे बापू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राजेंद्र प्रसाद विद्यालयात वकृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते स्वर्गीय शिवाजीराव नागवडे बापू यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था व ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था या संस्थांतील विद्यालयास्तरावर विद्यार्थ्यांनी मोठा विविध स्पर्धांच्या माध्यमातून सहभाग नोंदवला प्रामुख्याने या दोन्हीही संस्थांच्या वतीने डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालयात वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर सहकार महर्षी बापूंच्या जयंती महोत्सवानिमित्त संस्थांतील प्रत्येक विद्यालयांमध्ये रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा तसेच निबंध स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान छत्रपती व ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था अंतर्गत असणाऱ्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खास डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयात वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. प्रामुख्याने लहान गटांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर मोठ्या गटांमध्ये आठवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. वकृत्व स्पर्धेचा विषय सहकार व शिक्षण महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांचे जीवन कार्य आणि पर्यावरण व वृक्ष संवर्धन हा विषय ठेवण्यात आला होता.
प्रामुख्याने वकृत्व स्पर्धेत लहान गटामध्ये लोणी व्यंकनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी कापसे गीतांजली नवनाथ या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळविला. तर यशवंतराव चव्हाण विद्यालयाची विद्यार्थिनी कु. खामकर तनवी बंडू या विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक आला. डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालयाची विद्यार्थिनी कु. रेपाळे अक्षरा दत्तात्रेय हिला तिसरा क्रमांक मिळाला. अनुक्रमे लोणी व्यंकनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी कु. जठार अनुश्री अमोल व लालबहादूर शास्त्री विद्यालयाची विद्यार्थिनी कु. गारुडकर पूर्वी संजय या दोन्ही विद्यार्थिनींना समान गुण प्राप्त झाल्याने चौथा क्रमांक मिळाला. लालबहादूर शास्त्री विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी वाळूंज ईश्वरी किशोरचंद्र या विद्यार्थिनींला पाचवा क्रमांक मिळाला. या लहान गटासाठी परीक्षक म्हणून उपशिक्षक श्री लगड एस पी, श्रीमती अनंत्रे व्ही व्ही, श्री गायकवाड डीपी आणि श्री जामदार एस.ए आदी शिक्षकांनी कामकाज पाहिले.
* मोठा गट आठवी ते दहावी
यशवंतराव चव्हाण विद्यालयाची विद्यार्थिनी कु. शिंदे आरती सुरेश या विद्यार्थिनीचा वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. तर द्वितीय क्रमांक डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालयाचा विद्यार्थी जगताप कार्तिक संभाजी या विद्यार्थ्याने मिळविला. तिसरा क्रमांक अनुक्रमे मीनल अतील सय्यद भानेश्वर विद्यालय भानगाव व राधा लहानु रोडे इंदिरा गांधी विद्या निकेतन श्रीगोंदा फॅक्टरी यांना समान गुण प्राप्त झाल्याने त्यांना तिसरा क्रमांक मिळाला. चौथा क्रमांक हंगेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी कदम भाग्यश्री बंडू तर शिंदे समृद्धी संतोष सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय लिंपणगाव व पल्लवी अर्जुन नावडकर राजीव गांधी विद्यालय चिखलठाणवाडी या तिन्हीही विद्यार्थिनींना समान गुण प्राप्त झाल्याने चौथा क्रमांक मिळाला. पाचवा क्रमांक संभाजी विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी गीता दत्तात्रय बाबर व श्री व्यंकनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी पूर्वा संतोष काकडे या दोन्ही विद्यार्थिनींना समान गुण प्राप्त झाल्याने पाचवा क्रमांक मिळाला मोठा गट स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपशिक्षक मधुकर नागवडे, मच्छिंद्र धोत्रे, पंढरीनाथ सुपेकर व ओंकार धुमाळ आदी शिक्षकांनी काम पाहिले तर प्रामुख्याने वरील दोन्ही गटाचे परीक्षक म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलकाताई दरेकर व नंदकुमार शितोळे यांनी काम पाहत मोठे परिश्रम घेतले. संस्थांतील यशस्वी विद्यार्थ्यांचे सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे सर्व विश्वस्त मंडळ तसेच छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड, ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी के लगड आदींनी अभिनंदन केले आहे.
या स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई दरेकर यांनी सन्मान करून शुभेच्छा देताना त्या म्हणाल्या की, शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण असतात, परंतु त्यांना स्पर्धेत संधी देऊन योग्य मार्गदर्शन केले तर निश्चितपणे आणखी या स्पर्धांमध्ये विद्यार्थी चमकल्याशिवाय राहणार नाहीत पुढे देखील प्रत्येक क्षेत्रात हे गुणी विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. असे सांगून श्रीमती दरेकर पुढे म्हणाल्या की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये तालुक्याच्या प्रत्येक विकास कामांमध्ये मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्याचे सतत स्मरण व्हावे हा हेतू त्यांच्या जयंतीनिमित्त या दोन्ही संस्थांनी समोर ठेवला होता. पुढे त्या म्हणाल्या की सहकार, शिक्षण, सिंचन, कृषी इत्यादी क्षेत्रात तालुका उंच शिखरावर पोहोचला हे केवळ सहकार महर्षी बापूंच्या अथक प्रयत्नामुळेच शक्य झाले आहे. त्यामुळे बापू आजही सर्वांना अजरामर वाटतात. शिक्षण महर्षी शिक्षण संस्था उभ्या करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी बापूंनी गावोगावी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उभी केली, त्यातून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात व उच्च पदावर जाऊन पोहोचले आहेत. याचे श्रेय खऱ्या अर्थाने सहकार महर्षी बापूंना जाते. असे सांगून विद्यालयात आयोजित वकृत्व स्पर्धेत छत्रपती व ज्ञानदीप संस्थान तील विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करून मनसोक्तपणे सहभाग घेत बापूंनी दिलेले तालुक्यासाठी भरीव योगदान तसेच पर्यावरण व वृक्ष संवर्धन किती काळाची गरज आहे, याविषयी सहभागी विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेतून पटवून दिले. त्याबद्दल सर्व यशस्वी व उपस्थित विद्यार्थी तसेच विद्यालयाच्या प्रतिनिधींचे मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई दरेकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन उपशिक्षक मच्छिंद्र मडके पाटील यांनी केले तर आभार उपशिक्षक नारायण झेंडे यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.