घरकुल प्रकल्पाचे काम अपूर्ण असताना सरपंच सदस्यांना विश्वासात न घेता उद्घाटन, हे राजकीय श्रेय घेण्याचा खटाटोप, सरपंचाचा प्रसिद्धी पत्रकारद्वारे गंभीर आरोप
By : Polticalface Team ,20-01-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी) वांगदरी, ता. श्रीगोंदा येथे चालू असलेल्या पथदर्शी घरकुल प्रकल्पाचे काम अपूर्ण असताना व ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य किंवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता किंवा त्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा न करता घाई घाईने पालकमंत्र्यांच्या हस्ते व तालुक्याचे आमदार यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केलेला उद्घाटन समारंभ म्हणजे न केलेल्या कामाचे राजकिय श्रेय घेण्याची खटपट असल्याचे प्रतिपादन वांगदरी गावचे सरपंच संजय नागवडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
यांसदर्भात प्रसिध्दी पत्रकांत नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे व जिल्हा परिषद सदस्या तथा जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. अनुराधा नागवडे यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामपंचायत हद्दीतील महाराष्ट्र शासनाची ३९ गुंठे जागा ग्रामपंचायतीकडे एक खास बाब म्हणुन वर्ग करुन घेतली. व सदर जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेतून जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांचा आदर्श पथदर्शी घरकुल प्रकल्प उभा करण्याचे काम अंतीम टप्प्यात आलेले आहे. सदरचा प्रकल्प ग्रामपंचायतीने बारकाईने लक्ष देवून स्लॅबच्या ३५ घरकुलांचे अतिशय दर्जेदार काम करुन घेतले आहे. एका घरकुलाचा अंदाजे एकुण खर्च ४ लाख २५ हजार रुपये असुन त्याकरीता प्रधानमंत्री आवास योजनेतून १ लाख २० हजार रुपये व गवंडी प्रशिक्षण योजनेतून ७८,७५० रुपये असे एकुण १ लाख ९८ हजार ७५० रु. प्राप्त इ ालेले आहेत. उर्वरीत ग्रामपंचायतीने इतर फंडातून खर्च केलेले आहेत. सदर कामाकरीता पुणे येथील रियल फॉर फाऊंडेशन यांनी २२ लाखाचा निधी दिलेला आहे.
राजेंद्रदादा नागवडे व सौ. अनुराधा नागवडे यांच्या विशेष प्रयत्नातूनच हा प्रकल्प पुर्णत्वास आलेला आहे. त्यास केंद्र व राज्य शासनाचे पाठबळ मिळालेले आहे याची आम्हांला जाणीव आहे. परंतु अद्याप सदर घरकुलांच्या आतील बाजुची रंग रंगोटी, बीज, पाणी व शौचालय या मुलभूत सुविधा झालेल्या नाहीत. सदरची अपुर्ण कामे पूर्ण करणेकरीता ग्रामपंचायत कार्यरत आहे. सदरचा प्रकल्प पूर्ण झालेनंतर सर्वांना विश्वासात घेवून गांवच्या वतीने संयुक्तीकरित्या मोठा भव्य पालकमंत्र्यांच्याच शुभ हस्ते उद्घाटन समारंभ करण्याचा आमचा मानस होता. पालकमंत्र्यांना किंवा तालुक्याच्या आमदारांना आमचा अजिबात विरोध नाही. सन २०१९ च्या विधानसभेत आम्ही सर्वांनी राजेंद्रदादा नागवडे यांच्या आदेशावरुन आमदार बबनराव पाचपुते यांना मदत केलेली आहे.
परंतु सदर
प्रकल्पाची कामे अपूर्ण असताना, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्याशी कसल्याही प्रकारची चर्चा न करता केवळ न केलेल्या कामाचे राजकिय श्रेय घेण्याचे उद्देशाने थेट पालकमंत्र्यांच्या व आमदार यांचे हस्ते सदर प्रकल्पाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम परस्पर आयोजित करणेत आलेला आहे. ही बाब अत्यंत खेदजनक व अयोग्य आहे. अशा प्रकारे उद्घाटन करु नये अशी आमची ग्रामस्थांची मागणी असुन या प्रवृत्तीचा सरपंच या नात्याने संपूर्ण गावच्या वतीने आम्ही निषेध करीत असुन सदर कार्यक्रमावर बहिष्कार टाकीत आहोत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.