जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर महासंघाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांची निवड
By : Polticalface Team ,22-01-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी )अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याचे सुपुत्र शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व व एक निर्भीड व धाडसी ज्येष्ठ पत्रकार श्री नंदकुमार कुरुमकर यांची नुकतीच जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर संघाच्या प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
दरम्यान जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर महासंघाचा जिल्हास्तरीय मेळावा अहमदनगर येथील यशवंतराव चव्हाण फार्मसी कॉलेज येथे राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी राज्य कार्यकारिणीने जिल्हा व तालुका कार्यकारिणींच्या यावेळी सक्षम कार्यकर्त्यांच्या निवडणुका करण्यात आल्या. त्यामध्ये श्रीगोंदातून श्री व्यंकनाथ विद्यालयाचे पत्रकार श्री नंदकुमार कुरुमकर यांची याप्रसंगी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून राज्य अध्यक्ष वाल्मीक सुरासे यांनी नियुक्तीपत्रद्वारे जाहीर केली.
दरम्यान पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी गेली 35 वर्ष तालुका व जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे विविध पदावर प्रतिनिधित्व केले एक धाडसी व शिस्तप्रिय पत्रकार म्हणून त्यांची संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळख आहे प्रसिद्धीच्या माध्यमातून त्यांनी विशेषता शिक्षण क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व ज्ञानदान करणाऱ्या गुणवंत शिक्षकांच्या विशेष कर्तव्याचे वेळोवेळी लिखाण करून एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे मौलिक काम केले आहे. त्यांच्या या निवडीने निश्चितच राज्य व जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर महासंघाला प्रसिद्धीच्या माध्यमातून मोठे बळ मिळणार आहे. पत्रकार कुरुमकर हे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याने व सतत शिक्षक, शिक्षकेतरांच्या विविध प्रलंबित प्रश्न संदर्भात नेहमीच शासन दरबारी प्रसिद्धीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात त्यांचे कार्य निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी समजले जाते.
प्रसंगी जिल्ह्यातील असंख्य शिक्षकेतर बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवडीचे पत्र राज्य अध्यक्ष वाल्मीक सुरासे यांनी श्री कुरुमकर यांना प्रधान केले. या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर राज्याध्यक्ष वाल्मीक सुरासे, राज्य सचिव पाराजी मोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक समशेर पठाण, राज्य उपाध्यक्ष राजू पठाण, जिल्हा उपाध्यक्ष परशुराम वेताळ, सचिव भाऊसाहेब धनवटे, जिल्हा शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमजान हवलदार, माध्यमिक सोसायटीचे चेअरमन दिलीपराव काटे, संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड, निरीक्षक बी के लगड, अशोकराव आळेकर, वसंतराव पवार, विलास साळवे, किशोर जामदार, तालुका अध्यक्ष सुनील म्हस्के, प्राचार्य दत्तात्रय सस्ते आदींनी श्री कुरुमकर यांचे अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी