लिंपणगावच्या सिद्धेश्वर मंदिर राज्य संरक्षित स्मारक परिसरातील बंद बांधकाम तात्काळ सुरू करावे, सामाजिक कार्यकर्ते किरण कुरुमकर यांचे पुरातत्व विभागाला निवेदन

By : Polticalface Team ,22-01-2024

लिंपणगावच्या सिद्धेश्वर मंदिर राज्य संरक्षित स्मारक परिसरातील बंद बांधकाम तात्काळ सुरू करावे, 

          सामाजिक कार्यकर्ते किरण कुरुमकर यांचे पुरातत्व विभागाला निवेदन
लिंपणगाव (प्रतिनिधी)- लिंपणगाव तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सिद्धेश्वर महाराज मंदिर राज्य संरक्षित स्मारक परिसरातील काम हे गेल्या सहा महिन्यापासून ठप्प असून बांधकाम पुन्हा सुरू करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन लिंपणगावचे सामाजिक कार्यकर्ते किरण कुरुमकर यांनी ईमेल द्वारे सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नाशिक यांना पाठवले आहे.

सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, नाशिक यांना पाठवलेल्या निवेदनात श्री कुरुमकर यांनी म्हटले आहे की, मौजे लिंपणगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या गावातील प्राचीन कालीन सिद्धेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. असे पुरातत्त्व विभागाकडून समजते. जीर्णोद्धार करताना या मंदिराचा अधिकार आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात आहे. सदर मंदिराचे प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, दिनांक 21/ 6/ 2023 रोजी आपण मंदिराची पाहणी केली. तेव्हा आपणास मंदिर परिसरामध्ये विनापरवाना बांधकाम होत असल्याचे आपल्या निदर्शनास आले होते. आपण जावक क्रमांक 536 /2023 दिनांक 22 /6/ 2023 रोजी च्या पत्रानुसार मंदिर परिसरातील बांधकाम आपल्या विभागाने बंद पाडले. पुढे या निवेदनात श्री कुरुमकर यांनी आणखी म्हटले आहे की दिनांक 30/6/ 2023 च्या पत्रानुसार आपण मंदिर परिसरात संरक्षित स्मारकाचा फलक चोरी गेल्याची तक्रार संबंधित विभागाला आपण पत्राद्वारे कळवले. दिनांक 17/8/ 2023 रोजी च्या पत्रामध्ये सदर कामाचे कुठलेही देयक अदा करू नये, असा पत्रव्यवहार आपण संबंधित विभागाला केला या पत्रामुळे मंदिर परिसरामध्ये कुठलेही विकास काम झाले नाही. तसेच मंदिर परिसरामध्ये आपल्या विभागामार्फत पुरातत्वशास्त्र संकेतानुसार दर्जेदार गुणवत्ता पूर्ण कामे करण्यासाठी व मंदिर परिसरातील झालेले काम गुणवत्ता पूर्ण होत नसल्यामुळे ते काम विनापरवाना करणाऱ्यावरती कारवाई करण्यासाठी आपल्या विभागा विरोधात आम्ही 25 सप्टेंबर 2023 रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे आमरण उपोषणास बसलो होतो.

उपोषणा दरम्यान आम्ही प्रमुख सहा मागण्या केल्या होत्या. त्यावेळी आमचे उपोषण आपण दिलेल्या जावक क्रमांक 629 दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजीचे पत्रानुसार आम्ही केलेल्या सहा मागण्या मान्य केल्याचे पत्र आपण ई-मेल द्वारे व उपोषणस्थळी मागे घेण्यास कळविले. व आपल्या कार्यालयावर आम्ही विश्वास ठेवून उपोषण देखील सोडले. श्री किरण कुरुमकर यांनी या निवेदनात आणखी पुढे म्हटले आहे की, आमची मागणी क्रमांक चार नुसार अहमदनगर जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्ह्यातील महत्त्वाच्या संरक्षित स्मारकाकरिता प्राप्त झालेल्या निधीतून सिद्धेश्वर मंदिराच्या संवर्धनाचे काम प्रास्तावित आहे. या संदर्भात आपल्या कार्याद्वारे सदर स्मारकाच्या जतन संवर्धनाच्या कामाकरिता वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात आलेली असून, त्यांच्याद्वारे सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून संचालक पुरातत्व व वस्तू संग्रहालय यांच्या तांत्रिक मान्यतेनंतर व तदनंतर जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या प्रशासकीय मान्यते करता पाठवण्यात येईल. मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर कामांना तात्काळ सुरुवात करण्यात येईल, असे आपण मुद्दा क्रमांक चार मध्ये म्हटले होते. परंतु या लेखी उत्तराला जवळजवळ सहा महिने उलटले परंतु अद्याप प्रमाणे आपल्या विभागाकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही केल्याचे दिसत नाही. या प्रश्नासंदर्भात आपण तातडीने पुरातत्त्व शास्त्र संकेतानुसार दर्जेदार गुणवत्तापूर्ण काम सुरू करावे, अन्यथा आम्हाला पुन्हा आमरण उपोषणाची वेळ येऊ देऊ नये अशी अपेक्षा देखील श्री किरण कुरुमकर ईमेल द्वारे नाशिक येथील पुरातत्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.
पुरातत्त्व विभागाच्या पत्रव्यवहारामुळे मंदिर परिसरातील विकसित काम ठप्प पडलेले आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासन देखील या प्रश्न उदासीन असून, त्यांच्या हलगर्जीपणामुळेच काम बंद पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदर पुरातत्व विभागाने तात्काळ या कामाला सुरुवात करावी.- सामाजिक कार्यकर्ते किरण कुरुमकर

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष