नूतन माध्यमिक शिक्षकेतर पदाधिकाऱ्यांचा विविध शाळांमध्ये सन्मान
, तर व्यंकनाथ विद्यालयात देखील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा भव्य सन्मान
By : Polticalface Team ,24-01-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर महासंघाशी सलग्न असणाऱ्या श्रीगोंदा तालुका माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल तसेच सन्मान करण्यात आला. प्रामुख्याने श्रीगोंदा तालुका नूतन अध्यक्ष सुनील म्हस्के यांचा श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान च्या श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक श्री जामदार सर व सेवक वृंदांनी विद्यार्थ्यांसमवेत सन्मान केला ,तर तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब राऊत यांचा इंदिरा गांधी विद्या निकेतनमध्ये मुख्याध्यापक शिवाजीराव गवळी व सेवक वृंदांनी सत्कार केला. तालुका उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे यांचा देखील वडाळी माध्यमिक विद्यालयात सन्मान करण्यात आला. श्री व्यंकनाथ विद्यालयात जिल्हा महासंघाचे प्रसिद्धीप्रमुख पत्रकार नंदकुमार कुरुमकर व तालुका सहसचिव एकनाथ नेटवटे यांचा विद्यालयातर्फे नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून या दोन्हीही सत्कारमूर्तींना पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त देण्यात आल्या.
श्रीगोंदा येथे आयोजित सत्कारला उत्तर देताना संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील म्हस्के यावेळी म्हणाले की, राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे व राज्यसचिव पाराजी मोरे, मार्गदर्शक समशेर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका शिक्षकेतर संघटना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करणार आहे. निश्चितच राज्य अध्यक्ष वाल्मीक सुरासे राज्यातील शिक्षकेतरांचे लढाऊ नेतृत्व लाभल्याने शिक्षकेतरांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. अनेक प्रश्नांसाठी राज्याध्यक्ष सुरासे हे शासन स्तरावर वेळोवेळी आढावा घेऊन मंत्रालय मध्ये वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षकेतरांना लवकरच न्याय मिळण्याची प्रतीक्षा आहे तेव्हा जिल्ह्यातील शिक्षकेतर संघटना अधिकाधिक बळकट करून आम्ही सर्व पदाधिकारी तालुक्यातील प्रत्येक शाळेला भेटी देऊन अडचणी संदर्भात शिक्षकेतर बांधवांशी संवाद साधणार असल्याचे तालुकाध्यक्ष म्हस्के यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान विविध विद्यालयातील प्राचार्य दत्तात्रय सस्ते, मुख्याध्यापक सर्वश्री शिवाजीराव गवळी, श्री जामदार सर, वागस्कर सर आदींनी शिक्षकेतर महासंघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. लोणी व्यंकनाथ विद्यालयात आयोजित सोहळ्यामध्ये कोमल शिंगाडे या एमपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची मंत्रालयामध्ये उपकक्ष अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. त्यांचाही सत्कार करण्यात आला. तर लोणी व्यंकनाथ येथील धनराज कोकरे व सौ कोकरे यांनी हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केल्यानंतर त्यांना कॅनडा येथे नागरिकत्व मिळाल्याने त्यांचाही विद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला. तर किल्ले स्पर्धा 2023 या स्पर्धेत विद्यालयाच्या सहभागी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रकशुट देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला नागवडे कारखान्याचे अध्यक्ष डी आर काकडे, भाऊसाहेब बरकडे, भरत शेठ नाहटा, माजी मंडल अधिकारी शिंगाडे, भाऊसाहेब, प्राचार्य दत्तात्रय सस्ते, बेलवंडी गणप्रमुख आकाश पुराणे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
श्री व्यंकनाथ विद्यालयात सन्मान सोहळ्याप्रसंगी सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव इथापे यांनी केले. आभार शिक्षक अनंत कांबळे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी