लिंपणगाव (प्रतिनिधी)- सोनुबाई सखाराम महाजन प्रशाला मांडवगण तालुका श्रीगोंदा येथील कार्यरत कर्मचारी रंजीत नाना साळवे वय 35 यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 2008 पासून येथील विद्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते त्यांचे मुळगाव कानूर पठार तालुका पारनेर येथील रहिवासी होते. कै साळवे यांच्या निधनाची बातमी मांडवगण परिसरात कळतच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पक्षात पत्नी व दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर अहमदनगर येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कार प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन रसाळ यांनी कै रंजीत साळवे यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सेवकवृंद यांच्यासह कानूर पठार येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कै साळवे यांच्या निधनाबद्दल राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे, राज्यसचिव पाराजी मोरे, राज्य उपाध्यक्ष राजू पठाण, मार्गदर्शक समशेर पठाण, जिल्हा उपाध्यक्ष परशुराम वेताळ, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नंदकुमार कुरुमकर, तालुका अध्यक्ष सुनील म्हस्के आदींनी शोक व्यक्त केला आहे.
वाचक क्रमांक :