खामगाव न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे १० वी मधिल माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न, गावातील जेष्ठ नागरिकांनी केले कौतुक,

By : Polticalface Team ,25-01-2024

खामगाव न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे १० वी मधिल माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न, गावातील जेष्ठ नागरिकांनी केले कौतुक,
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता, २४ जानेवारी २०२४ दौंड तालुक्यातील मौजे खामगाव ता दौंड जिल्हा पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सन २००७-८ या वर्षाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी एकत्रित येऊन दि,२१ जानेवारी २०२४ रोजी माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष व खंबेश्वर शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री माणिकराव कृष्णाजी नागवडे यांच्या हस्ते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व तसेच वर्ग शिक्षकांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, या वेळी अनेक माजी विद्यार्थी मित्रांनी आपले मनोगत व्यक्त केले, बाल विद्यार्थी जीवनातील विस्मरणीय आठवणी सांगत, बालपणी शिक्षकांनी शिकवलेल्या संस्कारामुळे जीवनात आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची परिभाषा उमगली असून जीवनाला कलाटणी मिळाली असल्याचे अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, तसेच पुढे बोलताना म्हणाले, आज इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणीन पैकी प्रत्येक जण विविध क्षेत्रामध्ये पारंगत असुन. उच्च शिक्षणाने पुढे गेलेले मित्र, सरकारी अधिकारी तर कोणी पदाधिकारी झाले, तर कोणी नोकरी शेती, व्यवसाय, व्यापार सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये तर कोणी समाज सेवेत आपले जीवन आनंदमय व सुखमय व्यक्त करीत आहेत. याचा अभिमान असल्याचे सांगत विद्यार्थी मित्रांमध्ये जिव्हाळा निर्माण करण्यात आला, या प्रतिक्रिया मध्ये प्रामुख्याने माजी विद्यार्थी, हनुमंत कोळपे, इरफान खान, नितल नागवडे अमृता नागवडे, यांचा समावेश होता, या प्रसंगी दहावी बॅचचे वर्ग शिक्षक गुरुवर्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या १० वी च्या वर्गातील जुन्या आठवणींना उजाळा देऊन माजी विद्यार्थी मुला मुलींच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केले, या वेळी खामगाव न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे आजी माजी गुरुवर्य शिक्षकांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माणिकराव कृष्णाजी नागवडे, आपल्या भाषणातून बोलताना म्हणाले. उच्च माध्यमिक शाळा गावच्या विकासात महत्त्वाचे स्थान बजावत असते त्यामुळे गावातील विद्यार्थी मुलं हे उद्याचे सुज्ञ ग्रामस्थ म्हणून उदयास येतात. व माजी विद्यार्थी गावच्या विकासाला चालना देतात, अशी प्रतिक्रिया खंबेश्वर शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री माणिकराव कृष्णाजी नागवडे त्यांनी व्यक्त केली, या प्रसंगी माजी विद्यार्थी यांच्या सहकार्यातून व शिक्षकांच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांचे छायाचित्र असलेल्या दिन दर्शिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच माजी विद्यार्थी स्नेह मेळावा कार्यक्रमाचे युट्युब लाईव्ह प्रक्षेपण ही करण्यात आले या प्रसंगी खामगाव आणि परिसरातील अनेक लोक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली होती, माजी विद्यार्थी स्नेह मेळावा हा कार्यक्रम यशस्वी झाल्या बद्दल माजी विद्यार्थी मुला मुलींचे मान्यवरांनी कौतुक आले, या प्रसंगी खामगाव येथील जेष्ठ नागरिक व ग्रामस्थांनी बोलताना सांगितले, खामगाव शाळेच्या व गावच्या इतिहासात अज पर्यंत अशा प्रकाचा उत्कृष्ट कार्यक्रम पाहिला नाही, तसेच माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचा सोहळा आज पर्यंत झाला नाही, अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश नेटके सर यांनी केले तर अनुमोदन वैभव नागवडे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण पौर्णिमा टिळेकर यांनी केले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गेली महिनाभर मेहनत घेतली त्यामध्ये प्रामुख्याने वैभव नागवडे, योगेश खेडेकर, गोपाल नागवडे, तुषार बनकर, गायत्री घोळे, शितल घुले यांचा समावेश होता.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष