भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रा.डॉ.चांगदेव कांबळे सोलापूर लोकसभेचे दावेदार
By : Polticalface Team ,25-01-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी या निवडणुका लाढविनार असून गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने सर्वच क्षेत्रात केलेली नेत्रदीपक कामगिरी मतदाराला भुरळ पाडणारी आहे. राष्ट्र हिताला प्राधान्य देऊन सतत काम करून सामान्य माणसाला जोडण्याचे काम केलेले आहे.याच पार्श्भूमीवर ४२,सोलापूर लोकसभा मतदार संघ हा अनुसूचीत जातीसाठी आरक्षित आहे.या मतदार संघात अक्कलकोट,दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर,सोलापूर शहर मध्य,मोहोळ,पंढरपूर - मंगळवेढा या तालुक्यांचा समावेश आहे. सध्या भारतीय जनता पक्षाचे चार आमदार आहेत.त्यामध्ये आ.सचिन कल्याणशेट्टी, आ.विजयकुमार देशमुख, आ.सुभाष बापू देशमुख, आ.समाधान आवताडे,माजी आ.प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आ.यशवंत माने हे हक्काचे आमदार आहेत.२०१४ व २०१९ पासून सोलापूर लोकसभेचे खासदार भाजपचे राहिलेले आहेत.त्यांनी माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला आहे.म्हणून हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला झाला आहे.
गेल्या २०१९चे निवडणुकीत वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी एक लाख सत्तर हजार मते घेतली होती.यावेळी सुशीलकुमार शिंदे यांना मंगळवेढा,पंढरपूर,मोहळ या तालुकयांमध्ये लीड मिळाले होते.
सध्याचे खासदार डॉ.जयसिद्धेश्र्वर महस्वामी यांच्या जातीच्या दाखल्याचे प्रकरण कोर्टात आहे. त्यांच्यविषयी मतदारांमध्ये नाराजी आहे.या बाबीचा विचार करता एक स्थानिक उमेदवार म्हणून गेली चाळीस बेचाळीस वर्षे भाजपाचे निष्ठावान व संघाचे मुशीतून तयार झालेले आणि १९९६ व १९९८ ला पंढरपूर राखीव लोकसभा मतदार संघातून कमळ चिन्हावर भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवून त्याकाळी सव्वा दोन लाखापर्यंत मते मिळवलेले आनुभवी असणारे प्रा.डॉ.चांगदेव कांबळे हे निष्कलंक व स्वच्छ चारित्र्याचे,प्रचंड लोकसंपर्क असणारे आणि गटातटा पासून अलिप्त आसणारे फक्त भाजपा म्हणून काम करणारे हेच सोलापूर लोकसभेसाठी दावेदार असू शकतात.
प्रा.डॉ. चांगदेव कांबळे हे रयत शिक्षण संस्थेत ३६वर्षे सिनियर कॉलेजला मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.ज्या काळात भाजपला उमेदवार मिळत नव्हता त्या काळात सहकाराचे प्राबल्य आसणाऱ्या प.महाराष्ट्रात खेड्यापाड्यात कमळ फुलविण्याचे काम प्रा.कांबळे यांनी केले आहे.त्यामुळे ते प्रबळ दावेदार असू शकतात.
शिवाय प्रा.डॉ.कांबळे हे गेली वीस वर्षे पंढरपूर येथे वास्तव्य करतात.ते पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यायामध्ये प्रभारी प्राचार्य होते.त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जुलै २०२३ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेऊन पूर्णवेळ भाजपचे काम केले असून त्यांचा मोठा विद्यार्थीवर्ग चाहता आहे.मंगळवेढा,पंढरपूर व मोहोळ या भागातून ते मोठे मताधिक्य घेऊन निवडून येऊ शकतात.म्हणून सोलापूर लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा.डॉ चांगदेव कांबळे हेच असतील.अशी सर्वत्र चर्चा आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.