मराठा आरक्षण नागरिकांचे सर्वेक्षण कामकाज सहकारी शाळांसमोर अडचणी राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मुख्य सचिवांना निवेदन

By : Polticalface Team ,25-01-2024

मराठा आरक्षण नागरिकांचे सर्वेक्षण कामकाज सहकारी शाळांसमोर अडचणी

     राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मुख्य सचिवांना निवेदन
.. लिंपणगाव (प्रतिनिधी) मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करताना सरकारी शाळांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्याने या निर्णयाचा फेरविचार करावा, असे निवेदन राज्य प्राथमिक शिक्षक संघाने राज्याचे मुख्य सचिव यांना निवेदन सादर केले आहे.
राज्याचे मुख्य सचिव व राज्य मागासवर्ग आयोगाच्या सचिवांना दिलेल्या निवेदनात शिक्षक महासंघाचे नेते श्री थोरात व महासचिव बाळासाहेब झावरे यांनी म्हटले आहे की, मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करताना प्रगणक व पदविक्षक म्हणून आपले वतीने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांचे आदेशानुसार मंगळवार दि. 23 जानेवारी 2024 ते दि. 31 जानेवारी 2024 ह्या कालावधीत आपल्या राज्यातील सरकारी शाळांतील बहुतांश प्राथमिक शिक्षक यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आलेल्या आहे. आपल्या राज्यातील सरकारी शाळांतील प्राथमिक शिक्षक हे राष्ट्रीय कार्य तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. तसेच शासन आदेशांचा नेहमीच सन्मान कटीत असतात. अनेक वेळा शालेय काम आणि विद्यार्थी हिताला बाधा येईल अशा शैक्षणिक कामामुळे विद्यार्थी शिक्षणामध्ये अडचणी येतात. तरी देखील सर्व प्राथमिक शिक्षक शैक्षणिक कामकाजाबटोबरच अरीक्षणिक काम शासन आदेश असल्यास यथायोग्य पद्धतीने पार पाडतात. मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण कामकाज करतांना सरकारी शाळांतील खालील अडचणींबाबत सकारात्मक विचार करुन निर्णय घ्यावेत,
प्रामुख्याने, सदरील सर्वेक्षण काम करताना प्रशासनाकडून दबाव, शासकीय सुविधांची अनुपलब्धता, सर्वरची अकार्यक्षमता अशा प्रकारच्या अडचणी काम करताना येत आहेत. बहुतांश सरकारी शाळांतील संपूर्ण स्टाफ अथवा 70% पेक्षा जास्त स्टाफ सर्व्हेक्षण कामी नियुक्त केला असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मोठे नुकसान आणि पालकांचा असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने प्राथमिक शिक्षकांवर अतिरिक्त मानसिक दबाव निर्माण करू नये, अथवा कारवाईचा बडगा दाखवू नये. जिल्हाधिकारी व महसूल प्रशासनाकडून दाबावात्मक बाबी घडल्यास ते प्राथमिक शिक्षकांवर अन्यायकारक ठरेल. त्यासाठी योग्य काळजी प्रशासनाने घ्यावी, विद्यार्थी आणि शिक्षण हितासाठी शालेय दैनंदिन कामकाज बाधित होणार नाही अशी व्यवस्था नियोजित करावी. या राज्य शिक्षक संघाच्या निवेदनात आणखी पुढे म्हटले आहे की, एकूण आवश्यक कर्मचारी संख्येपैकी 80% एवढ्या मोठ्या संख्येने प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सर्वेक्षण कामी नियुक्त केलेले आहेत. मात्र इतर विभागातील कर्मचारी उपलब्ध असूनही नगण्य संख्येने नियुक्त केलेले आहेत. तरी सर्वेक्षण कामी शिक्षण विभाग सोडून पर्यायी इतर विभागातील कर्मचारी नियुक्त करावेत असे या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री तसेच राज्याचे मुख्य सचिव व मागासवर्गीय आयोगाचे सचिव यांना दिलेल्या राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले असून, या निवेदनावर राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब झावरे, सरचिटणीस आबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष उत्तम वायाळ, कार्याध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, कार्यकारी अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी