लिंपणगाव ग्रामस्थांकडून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलकांना स्वयंपुरतीने मोठी मदत

By : Polticalface Team ,25-01-2024

लिंपणगाव ग्रामस्थांकडून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलकांना स्वयंपुरतीने मोठी मदत
लिंपणगाव (प्रतिनिधी)- संपूर्ण देश व राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने आझाद मैदानाकडे जात असताना अहमदनगर वरून पारनेर तालुक्यातील सुपे येथे मुक्कामी असणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांना लिंपणगाव ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य व एक पिकप पाणी बॉटल घेऊन लिंपणगावच्या ग्रामस्थांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. प्रामुख्याने जरांगे पाटलांच्या या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या झंजावाती आंदोलनासाठी लिंपणगावच्या सर्वच जाती धर्मातील ग्रामस्थांनी भरीव मदत देऊन जरांगे पाटील "तुम आगे चलो" हम तुम्हारे साथ है असा नाराज देत लिंपणगाव पंचक्रोशीतील अनेक तरुणांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
यावेळी लिंपणगावचे माजी सरपंच अरविंद कुरुमकर व युवक नेते निलेश कुरुमकर यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मराठा समाजाचे अनेक कुटुंब हे दारिद्र्यात जीवन जगत आहेत. ही केवळ आरक्षण नसल्यामुळे वेळ येऊन ठेपले आहे. काही मराठा समाज रोजंदारीवर काम करत आहेत. अनेक मराठा कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत. त्यामध्ये मराठा समाजातील गरीब कुटुंबातील मुले हे उच्चशिक्षित मोठ्या प्रमाणात झालेले असताना देखील या कुटुंबातील मुलांना मोलमजुरी करण्याची वेळ आलेली आहे. हे केवळ मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे घडले गेलेले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही मनोज जरांगे पाटलांची मागणी रास्त असून, मराठा समाजाच्या गरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबाची नोंद पूर्वी शासन दरबारी कुणबी म्हणून असतानाही राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक या नोंदणीकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या कुटुंबावर आरक्षणाअभावी दारिद्र्यात जीवन जगण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.
पत्रकारांशी बोलताना या युवकांनी आणखी पुढे म्हटले आहे की, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण का नको ही भूमिका मांडली आहे त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. पूर्वीच्या मराठा समाजाच्या नोंदी असूनही कुणबी पत्र मराठा समाजाला देण्यात आलेले नाही. सध्या सुरू असलेले मराठा नागरिकांचे आरक्षणासंदर्भात अनेक नोंदी देखील परीक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सापडले असून, मराठा समाजाला हक्काचं आरक्षण राज्य सरकारला द्यावेच लागेल. त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही ठाम आमचे नेते जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे माजी सरपंच अरविंद कुरुमकर, निलेश कुरुमकर, सामाजिक कार्यकर्ते किरण कुरुमकर विजय विनायक कुरुमकर, नामदेव जामले यांच्यासह असंख्य लिंपणगावच्या ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा व्यक्त केला आहे.
आम्ही लिंपणगावकर लवकरच मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आझाद मैदानाकडे स्वयंपूर्ण जाणार आहोत असे माजी सरपंच अरविंद कुरुमकर व निलेश कुरुमकर, किरण कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी