कर्मयोगी सुभाष अण्णा कुल प्राथमिक शिक्षण संस्थेच्या संचालक पदी शंकर भुजबळ यांची बिनविरोध निवड
By : Polticalface Team ,26-01-2024
दौंड (प्रतिनिधी) दौंड तालुक्यातील गोपाळवाडी गावचे श्री शंकर रामचंद्र भुजबळ यांची कर्मयोगी सुभाष अण्णा कुल प्राथमिक शिक्षक संस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे, शंकर भुजबळ हे येडेवाडी येथील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे, यावेळी नवनव्याची संचालक श्री शंकर भुजबळ म्हणाले की, सर्व संचालक व सर्व सभासदांना बरोबर घेऊन संस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली, संचालक पदी निवड झाल्याने शंकर भुजबळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
वाचक क्रमांक :