छत्रपती कॉलेजचा राज्यस्तरीय पुरस्कारांचा षटकार! करिअर कट्टा राज्यस्तरीय स्पर्धेत महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश

By : Polticalface Team ,27-01-2024

छत्रपती कॉलेजचा राज्यस्तरीय पुरस्कारांचा षटकार! करिअर कट्टा राज्यस्तरीय स्पर्धेत महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश
     लिंपणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्रा द्वारे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास करिअर कट्टा २०२४ अंतर्गत राज्यस्तरीय ६ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून महाराष्ट्र राज्यातून पाचवा क्रमांक मिळाला आहे तसेच अहमदनगर जिल्ह्यातून व्दितीय क्रमांक प्राप्त झाला. प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांना उत्कृष्ट प्राचार्य म्हणून राज्यातून चतुर्थ क्रमांक प्राप्त झाला तसेच जिल्ह्यातून व्दितीय क्रमांक प्राप्त झाला. प्रा.विलास सुद्रिक यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला तर विद्यार्थ्यांच्या करिअर संसदेस उत्कृष्ट करिअर संसद म्हणून जिल्ह्यातून व्दितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. हा महाविद्यालयाचा बहुमान आहे.
शिवाजीराव नागवडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने १९८२ साली महाविद्यालय सुरू केले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत संस्थेच्या गुणात्मक प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. ९९ विद्यार्थी संख्येवर सुरू झालेले महाविद्यालय आज ३८२७ विदयार्थी अध्यापन करत आहे.१६ एकर भौतिक सुविधा असलेला सुंदर परिसर आहे. बापूंच्या संस्कारात वाढलेले राजेंद्रदादा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची उत्तम प्रगती सुरू आहे.‘नॅक’मध्ये मिळविलेले ए प्लस मानांकन त्याचे द्योतक आहे.
छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांनी शुभेच्छा देत, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या कष्टातून उत्तम प्रावीण्य मिळवत आहेत.विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासाला प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देऊन अनेक कौशल्य विद्यार्थी आत्मसात करत आहे. परिणामी उच्चतम निकाल व आधुनिक तंत्रज्ञानचा वापर यामुळे महाविद्यालय नावारूपाला आले आहे.महाविद्यालयाची प्रगती अशीच उत्तरोत्तर वाढत जावो या शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सूर्यवंशी यांच्या मौलिक व्यवस्थापनामुळे नॅकचा ए प्लस दर्जा प्राप्त करता आला. एक वर्षात ५७ पोलीस-सैन्य दल,१९ नौदल, ५१ बँक-इंडस्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत आहेत. विद्यार्थ्याना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. बापूंनी बिकट परिस्थितीत या संस्थेच्या गुणात्मक प्रगतीसाठी जीवाचे रान केले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आम्ही सर्व करत आहोत. सर्व पुरस्कार स्व. बापूंना अर्पण करत सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे विद्यापीठ स्थापन करण्याचे आमचे लक्ष आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या यशाबद्दल प्राध्यापक आणि शिक्षकेतर वृंदाचे अनुराधाताई नागवडे,बाबासाहेब भोस,बापूराव नागवडे,सचिनराव लगड व सर्व विश्वस्थ यांनी अभिनंदन केले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी