नीतिमूल्य चांगले असेल तर महान अधिकाऱ्यांनाही मार्गदर्शन करू शकता -तानाजी महाराज पांडुळे
By : Polticalface Team ,28-01-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- जीवन जगत असताना प्रत्येकाचे नीतिमूल्य चांगले असेल तर महान अधिकाऱ्यांनाही मार्गदर्शन करू शकता, असा सल्ला ज्येष्ठ प्रबोधनकार ह भ प तानाजी महाराज पांडुळे यांनी व्यक्त केला.
लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा येथे 27 जानेवारी रोजी व्यसनमुक्ती महासंघाचे संस्थापक गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांच्या विचारसरणीतून एक दिवशीय व्यसनमुक्ती युवक संघाच्या वतीने शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित युवक व विद्यार्थ्यांना प्रबोधन करत पांडुळे महाराज पुढे म्हणाले की, जीवन जगण्यासाठी शरीरात ताकद पाहिजे, शरीर बळकट असायला हवे शारीरिक शक्ती, बुद्धी, मानसिक शक्ती या महत्त्वाच्या बाबी शरीरात असेल तर जीवन आनंदी राहते. त्यामध्ये ज्ञान महत्त्वाचे आहे. जीवनामध्ये सत्कार्याला देखील तितकेच महत्त्व असून, आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना विसरता कामा नये. त्यांच्या कष्टाची किंमत प्रत्येकाने ठेवावी असे सांगून पांडुळे महाराज पुढे म्हणाले की, प्रत्येकाने निर्व्यसनी रहावे शिक्षणाच्या पलीकडे जाऊन मूल्य काय असते या संस्कारातून समजते. माणसाने जगावे कसे हे भगवत गीतेतून समजते. मरावे कसे हे छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा तर जीवन यशस्वीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचावे, व्यसनापासून प्रत्येकाने दूर राहून आनंदी, निरोगी आयुष्य जगावे. हीच खरी जीवनातील नीतीमूल्य आहेत. असे पांडुळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जेष्ठ व्याख्याते प्रा मारुती शेळके यांनी ज्येष्ठ प्रबोधनकार बंडातात्या कराडकर यांनी व्यसनमुक्ती महासंघ स्थापून पंचवीस वर्षे झाले. त्यांचे हे रोपे महत्त्वाचे वर्ष समजले जाते. युवकांच्या निरोगी जीवनासाठी या संघाचे कार्य स्तुत्य आहे. आई वडील व शिक्षणातून मिळालेले संस्कार हे प्रत्येकाच्या जीवनात करिअर घडत असतं. असे सांगून ते पुढे म्हणाले की, ध्येयप्राप्तीसाठी प्रत्येकाच्या अंगी जिद्द असायला हवी, व्यसनमुक्त, कष्टाळू, अभ्यासू विद्यार्थीच प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. प्रत्येक क्षणाचा उपयोग चांगल्या सत्कार्यात घालवा. तरच जीवन यशस्वी होऊ शकते, असा सल्ला यावेळी श्री प्रा. शेळके यांनी यावेळी दिला.
प्रास्ताविकात प्राचार्य दत्तात्रेय सस्ते यांनी राज्य व्यसनमुक्ती युवक महासंघाचा हेतू यावेळी स्पष्ट करून उपस्थितांचे स्वागत केले.
याप्रसंगी राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा, नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे, विलासराव काकडे, पुरुषोत्तम लगड, राजेंद्र काकडे, शरद काकडे, नारायण गवळी, अनिल महाराज गिरमकर, गणपतराव काकडे, एम आर पवार सर, प्रकाश काकडे, नलगे महाराज, दीपक महाराज जाधव, केशव महाराज मुळीक, भागवत गुरुजी, अविनाश काकडे, दादासाहेब शेलार, भीमराव काकडे यांच्यासह वसुंधरा बचाव अभियानचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. विशेष सहकार्य अण्णा नेटवटे व मंदिराचे पुजारी बाळासाहेब लोहकरे यांनी केले. यावेळी विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी