महसूल विभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची माजी आमदार पाटील यांनी केली तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी

By : Polticalface Team ,29-01-2024

महसूल विभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची माजी आमदार पाटील यांनी केली तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी करमाळा प्रतिनिधी माजी आमदार नारायण पाटील यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची भेट घेऊन महसूल विभागाकडील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत एक निवेदन दिले असून सातबारा उताऱ्यावरील चूक दुरुस्तीसह अनेक कामांचा विषय मांडला. यावेळी त्यांचे समवेत बाजार समिती सदस्य नवनाथ झोळ, सभापती अतुल पाटील, उपसभापती दत्ता सरडे, गहिनीनाथ ननवरे, बिभीषण आवटे, भाजपा नेते अमरजीत साळुंके, शिवसेना तालुकप्रमुख देवानंद बागल, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जुनराव सरक, चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, माजी सरपंच हनुमंत सरडे, तरटगाव सरपंच तथा कुकडी संघर्ष समितीचे प्रमुख डॉक्टर अमोल घाडगे, बहुजन संघर्ष सेनेचे प्रमुख राजाभाऊ कदम, एन पी सोशल मीडिया वॉर रूम सदस्य दिग्विजय अंबारे, संजय तनपुरे, स्वीय सहायक सूर्यकांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सादर केलेल्या निवेदनात माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा तालुक्यातील कलम १५५ अन्वये ७/१२ उताऱ्यावरील चूक दुरुस्ती प्रकरणे व फेब्रुवारी २०२३ पासून प्रलंबित असलेली रस्ता प्रकरणाचा निपटारा होणेबाबत विनंती केली आहे. करमाळा तालुक्यातील तहसिल कार्यालयाकडे नागरिकांनी ७/१२ उताऱ्यावर झालेल्या कलम १५५ अन्वये चूक दुरुस्तीची अंदाजे ७०० ते ८०० प्रकरणे प्रलंबित आहेत. शेतकरी व ग्रामस्थ चूक दुरुस्ती होण्यासाठी आपल्या कार्यालयाकडे अनेक वर्षापासून हेलपाटे मारत आहेत. त्यांच्या उताऱ्यावर चूक असल्यामुळे त्यांना कोणतीही बँक कर्ज देत नाही. तसेच जमीन, जागा खरेदी, विक्रीसाठी त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे अशी खंत या निवेदनातून पाटील यांनी व्यक्त केली.तसेच फेब्रुवारी २०२३ पासून आपल्या कार्यालयाकडे अंदाजे ३०० ते ४०० रस्ता प्रकरणे प्रलंबित आहेत. काही रस्ता केसेसवर सुनावण्या होऊनही स्थळ पहाणी झालेल्या नाहीत. काही शेतकऱ्यांना रस्ता नसल्यामुळे त्यांना त्यांचा शेतमाल शेतातून बाहेर आणणे गैरसोयीचे होत असून त्यांची आर्थिक व मानसिक हानी होत आहे. रस्ता केसेसचा स्थळ पहाणी व हद्द खुणा दर्शवून निपटारा वेळेत केल्यास दोन शेतकऱ्यातील वाद संपुष्टात येऊन त्यांचे नुकसान वाचवता येईल याबाबत आपण महसूल विभागास अधिक कार्यरत होण्यास सूचना द्याव्यात ही मागणी पाटील यांनी केली. यावेळी रेशन कार्ड, धान्य वितरण, संजय गांधी निराधार योजनेतील समाविष्ट लाभार्थी आर्थिक मदत, नवीन लाभार्थी नावे, शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर झालेल्या मदतीबाबत आदी इतर महत्वाच्या विषयावर माजी आमदार नारायण पाटील यांनी साविस्तर चर्चा केली. या भेटी दरम्यान संजय तनपुरे यांना कुणबी दाखला तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी मान्यवरांचे उपस्थितीत दिला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष