गुंडेगाव केंद्रातील शिक्षकांकडून लाखो रुपयांचा घोटाळा, भाऊसाहेब शिंदे नी केला उघड, गट शिक्षणधिकारी जाधव यांनी दिले वसुली चे आदेश...

By : Polticalface Team ,29-01-2024

गुंडेगाव केंद्रातील शिक्षकांकडून लाखो रुपयांचा घोटाळा, भाऊसाहेब शिंदे नी केला उघड, गट शिक्षणधिकारी जाधव यांनी दिले वसुली चे आदेश... गुंडेगाव प्रतिनिधी(दादासाहेब जावळे )- नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील भाऊसाहेब रामदास शिंदे सामाजिक कार्यकर्ते यांनी शासन परिपत्रक ९ सप्टेंबर २०१९ च्या निर्णया नुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र, गुंडेगाव येथील कार्यरत असलेले मुख्याध्यापक व शिक्षक तसेच ग्रामीण भागातील कर्मचा-यांनी मुख्यालयी राहत नसले बाबत ग्रामपंचायतीचा ग्रामसभा ठराव घेऊन घरभाडे भत्ता घेणे आवश्यक असताना सन २०१९, २०२०, २०२१, २०२२, २०२३ या कालावधीत नियमबाह्य घरभाडे भत्ता घेतल्याची तक्रार केलेली होती. ग्रामसभा ठराव न देताच घरभाडे घेतले असून ते वसूल करण्यात यावे अशी मागणी केली होती. भाऊसाहेब रामदास शिंदे,यांनी गुंडेगांव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक असे एकूण २४ कर्मचारी मुख्यालयी न रहाता शासनाची फसवणूक करुन घेत असलेले घरभाडे तात्काळ बंद करावेत तसेच यापूर्वीचे घेतलेले घरभाडे वसूल करण्यात यावे.सर्व शिक्षक व मुख्याध्यापक हे मुख्यालयी रहात असल्याबाबत ग्रामसभेचा ठराव घेणे बंधनकारक असताना ग्राम सभेचा ठराव न घेताच घरभाडे घेतले असून ते वसूल करण्यात यावे. तसेच शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे सन २०१८ ते २०२३ पर्यंतचे कॉल डिटेल लोकेशन काढावेत गुंडेगांव केंद्रातील शिक्षक व मुख्याध्यापक मुख्यालयात राहात असलेल्या घराच्या पत्याजवळील लोकांकडून माहिती घेणे व शासनाची फसवणूक केलेल्या शिक्षकांवर व मुख्याध्यापकांवर तात्काळ फौजदारी गुन्हे नोंदवावेत अन्यथा २९/०१/२०२४ पासून श्रीराम व्यासपीठ गुंडेगाव येथे आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले होते.याबबत शिक्षक व मुख्याध्यापक यांना कारणे दाखवा नोटीस ही बजावून खुलासा विचारणा करण्यात आलेली होता.यानुसार दिनांक २७/०१/२०२४ रोजी चा खुलासा सादर केलेला होता सदरचे खुलासे संयुक्तिक नसल्याने तसेच शासन निर्णय दिनांक ९ सप्टेंबर २०१९ चे उल्लघंन झाल्याने अमान्य करण्यात आलेले आहेत.ज्याअर्थी सदर कालावधीत ग्रामसभा झालेले पुरावे तक्रारदार यांनी उपलब्ध करून दिले आहेत. तसेच तक्रारदार भाऊसाहेब शिंदे सामाजिक कार्यकर्ते यांनी संबंधित शिक्षक व मुख्याध्यापक यांनी घरभाडे भत्ता वसुली बाबत व प्रशासकीय कारवाई करणे बाबत मागणी केली असता रक्कम रु.३६,६४,९८०/- वसुलीची कारवाई करण्यात आली आहे.. चौकट.. गुंडेगाव केंद्रातील प्राथमिक शाळा येथील शिक्षकांवर घरभाडे भत्ता वसुलीची कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले असून त्याची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून केली जाईल.सदर पुरावे लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली.
बाबुराव जाधव, गट शिक्षण,अधिकारी,पंचायत समिती,अहमदनगर.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष