छत्रपती कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सुर्यवंशी यांची "करिअर कट्टा" उपक्रमाचे अहमदनगर जिल्हा प्राचार्य प्रवर्तक म्हणून निवड. उत्कृष्ट प्राचार्य म्हणून केलेल्या कामाची दखल

By : Polticalface Team ,29-01-2024

छत्रपती  कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सुर्यवंशी यांची लिंपणगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "करिअर कट्टा" या उपक्रमाअंतर्गत अहमदनगर जिल्हा प्राचार्य प्रवर्तक म्हणून श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सुर्यवंशी यांची दि. २७ जानेवारी २०२४ रोजी करिअर कट्टा चे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉ.दिनानाथ पाटील यांच्या उपस्थितीत एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या या महत्वाच्या उपक्रमात निवड होणे ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. सन २०२३ मध्ये छत्रपती महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये राबविलेले विविध उपक्रम, उत्कृष्ट प्राचार्य म्हणून मिळालेले २ राज्यस्तरीय पुरस्कार आणि कॉलेजला उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून मिळालेले २ पुरस्कार या सर्व बाबींचा विचार करून डॉ.सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली. महाविद्यालयात ते १९८७ पासून प्राणीशास्त्र विषयाचे अध्यापनाचे काम करत असून त्यांना ३७ वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे. त्यांनी एन. सी.सी.प्रमुख ,अंतर्गत गुणवत्ता कक्ष आणि नॅक समन्वयक तसेच विद्यापीठीय विविध कमिटी वरती काम केलेले आहे. सन २०२१ पासून ते प्राचार्य पदावर कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०२३ मध्ये नॅकचा ए प्लस दर्जा कॉलेजला प्राप्त झाला आहे. महाविद्यालयात राबविलेले विद्यार्थी केंद्रित उपक्रम आणि नवीन संकल्पना जिल्ह्यात करिअर कट्टा द्वारे राबवून करिअर कट्टाची व्याप्ती आणखी वाढवणार असल्याचे प्राचार्य डॉ.सुर्यवंशी यांनी नमूद केले. महाविद्यालयातील करिअर कट्टा उपक्रमात समन्वयक म्हणून प्रा.विलास सुद्रिक आणि प्रा.विजय इथापे हे मागील ३ वर्षापासून काम पहात आहेत. या निवडीबद्दल श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र (दादा) नागवडे, नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, सौ. अनुराधाताई नागवडे, संस्थेचे सेक्रेटरी बापू तात्या नागवडे, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्थ, तसेच कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी