काम करतांना दुसऱ्याचा विचार पहिले करणारे लोक थोर होतात, त्यामुळे दुसऱ्याचा आनंदासाठी सर्व काही करा. - सौ.अनुराधाताई नागवडे

By : Polticalface Team ,30-01-2024

काम करतांना दुसऱ्याचा विचार पहिले  करणारे लोक थोर होतात, त्यामुळे दुसऱ्याचा आनंदासाठी सर्व काही करा.
- सौ.अनुराधाताई नागवडे लिंपणगाव (प्रतिनिधी) :- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न, श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप नुकताच वांगदरी येथे पार पडला. "युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास" अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती या उपक्रमांतर्गत शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात विविध उपक्रम राबविण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामस्वच्छता, अंधश्रध्दा निर्मूलन,परिसरातील नवीन अंबिका मंदिर, जुने अंबिका मंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परीसर स्वच्छता तसेच रस्तेदुरुस्ती, आरोग्य व एड्स जनजागृती, वृक्षसंवर्धन, मतदार जनजागृती, शिवारफेरी, गटचर्चा, पोस्टर स्पर्धा इत्यादी उपक्रम शिबिरात राबविण्यात आले. श्रमदाना बरोबरच बौद्धिक घेवाण देवाण करण्यासाठी शिबिरात तज्ञ व्याख्यात्यांची व्याख्याने झाली. व्याख्यानाच्या पहिल्या दिवशी प्रा. नवनाथ शिंदे यांनी आयुष्यावर बोलू काही या विषयावर पुष्प गुंफले.डॉ. जगदीश राठोड यांचे अंधश्रद्धा निर्मूलन व संमोहनशास्त्र, प्रा. शंकर गवते यांचे जीवन सुंदर आहे, प्रा. तळपदे यांनी स्वतंत्र भारत आणि आजचा भारत या विषयावर तर प्रा. प्रकाश साळवे यांनी लोकसंख्या आणि उद्याचा भारत अशा विविध विषयांवर व्याख्याने झाली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला मा. सौ. अनुराधाताई नागवडे, अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा महिला काँग्रेस, या अध्यक्ष म्हणून लाभले.अध्यक्षीय भाषणात त्यांनी तरुणांना सकारात्मक विचारांनी स्वतःची, समाजाची प्रगती होते, जीवनतील प्रत्येक अडचणीवर मात करता येते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यास आपली ओळख निर्माण करता येते असे प्रतिपादन केले. या प्रसंगी सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा चे संचालक सौ. मंदाकिनी पाचपुते,सौ. सुरेखाताई लकडे,प्रा. सुरेश रसाळ हे उपस्थित होते. तसेच मौजे वांगदरी गावचे सरपंच श्री. संजय काका नागवडे, उपसरपंच सौ.छाया मासाळ, सौ. लगड मॅडम, श्री. दिलीपराव मासाळ, श्री.आबासाहेब जगताप, श्री. महेशशेठ नागवडे, श्री. शामराव नागवडे, श्री. साहेबराव महारनूर, श्री. दत्तात्रय भुजबळ, श्री. राजेंद्र महारनूर, श्री. अविनाश नागवडे, श्री. विष्णुआबा मोहिते, श्री. मधुतात्या नागवडे, श्री. विकास अडागळे, श्री. धनाजी चोरमले, श्री. रामचंद्र गवळी, श्री. पांडुरंग जाधव, श्री. अमरदीप नागवडे, श्री. शाहूकाका राऊत, श्री. फक्कडआबा राऊत, श्री. संतोष झेलकर, श्री. काशिनाथ पारखे, श्री. कैलास खोमणे, श्री. सर्जेराव मासाळ, श्री. सुभाषकाका गोरे, श्री.भाऊसाहेब गवळी, श्री. रमेश दिंडोरे ग्रामस्थ,ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण नागवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मनोहर सूर्यवंशी यांनी केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. मिलिंद बेडसे , प्रा. सौ. सुवर्णा भोस, प्रा. सखाराम पारखे, प्रा. किरण नागवडे तसेच कर्मचारी श्री बाबासाहेब, श्री. शहाजी शेळके व दिलीप मोहारे यांनी शिबिर कालावधीत विशेष परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.