श्रीगोंदा तालुक्याच्या पुढील उज्वल भविष्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार -सौ- अनुराधाताई नागवडे

By : Polticalface Team ,31-01-2024

श्रीगोंदा तालुक्याच्या पुढील उज्वल भविष्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार -सौ- अनुराधाताई नागवडे

     लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुका सहकार व शिक्षण महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंनी सर्व क्षेत्रात अहोरात्र कष्ट घेऊन तालुका सुजलाम सुफलाम केला. बापूंच्याच कार्याचा वारसा पुढे नेत आम्ही पुढील पिढीच्या भविष्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

</br>

     श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात हळदीकुंकू तिळगुळ वाटप त्यानिमित्त माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे या होत्या.

</br>

    या कार्यक्रमास सरपंच सौ अरुणाताई खोमणे, मा. सरपंच सविताताई कुचेकर. मा. चेअरमन विद्याताई जाधव, सौ निर्मला मोळक, सौ संगीताताई खामकर, उद्योजक मनीषाताई खामकर, सौ सविता खामकर, सौ सविताताई लगड, विद्याताई सांगळे अनिता कळमकर आदींसह हजारो महिला यावेळी उपस्थित होत्या.


    </br> 

</br>

       यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सौ नागवडे पुढे म्हणाले की, सहकार महर्षी बापूंनी सहकार, सिंचन, शिक्षण, कृषी या क्षेत्रात नेत्र दीपक काम केले. सत्ता नसतानाही बापूंनी श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याला मोठे वैभव प्राप्त करून दिले. आता यापुढे बापूंचे उर्वरित स्वप्न डोळ्यासमोर ठेवून सुशिक्षित तरुणांना नोकरीसाठी एमआयडीसी, महिलांना स्वयंरोजगार प्राप्त होण्यासाठी जिल्हा बँकेकडून रोजगार निर्मिती, विविध प्रकारचे प्रोजेक्ट, महिलांचे सक्षमीकरण व सुरक्षितता याकडे आपण अधिक लक्ष देणार आहोत. महिलांना 50 टक्के आरक्षण असताना महिलांनी धाडस करून प्रत्येक क्षेत्रात सहभाग घेतला पाहिजे. सौ. नागवडे आणखी पुढे म्हणाल्या की, गोरगरीब कुटुंबांच्या सेवेसाठी सहकार महर्षी बापूंच्या नावाने तालुक्यात हॉस्पिटल उभारून सामान्यांना रुग्णसेवा देण्याचा संकल्प लवकरच पूर्ण करणार आहोत. महिलांचे हळदी कुंकू हा जिव्हाळ्याचा प्रश्न समजला जातो. महिलां शिवाय कुटुंब व्यवस्थेमध्ये प्रत्येक घराला घरपण मिळत नाही त्यामुळे महिलांनी आता प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजे. संधीचा लाभ घेतला पाहिजे असे सांगून सौ नागवडे यांनी हळदी कुंकू व तिळगुळ महिलांना औक्षण केले.

</br>

         याप्रसंगी नागवडे कारखान्याचे संचालक शरदराव जगताप यावेळी म्हणाले की, पुरुषाच्या पाठीमागे महिला खंबीरपणे उभे राहतात म्हणून पुरुष विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. सहकार महर्षी बापूंनी तालुक्याच्या जडणघडणीसाठी अविरतपणे अखेरच्या श्वासापर्यंत योगदान दिले. म्हणूनच आज श्रीगोंदा सारख्या दुष्काळी तालुक्याला वैभव मिळाल्याचे सांगून दादा आणि वहिनी सहकार महर्षी बापूंचा खंबीरपणे वारसा पुढे जोपासत आहेत. आपणही त्यांना तालुक्याच्या उज्वल भविष्यासाठी साथ देण्याचे आवाहन केले.

</br>

        ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक बीके लगड यावेळी बोलताना म्हणाले की, सहकार महर्षी बापूंनी दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवत प्रत्येक खेडोपाडी ज्ञानगंगा उभारल्या. गावातच शिक्षण मिळाल्याने त्यातून अनेक मुले- मुली उच्चशिक्षित झाले. बापूंच्या रूपातून नागवडे कुटुंबाचे तालुक्यासाठी मोठे योगदान पाहता नागवडे कुटुंबातील सौ अनुराधाताई नागवडे वहिनींच्या रूपाने आमदार व्हावेत ही सदिच्छा असल्याने हजारो महिला आज या उपस्थित महिलांमधून दिसून येत असून महिलांनी आमदारकीचा संकल्प देखील केला आहे निश्चितच आता महिलांना मोठी संधी आल्याने महिलांनी देखील सौ अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आवाहन श्री लगड यांनी केले.

</br>

             याप्रसंगी साधनाताई जगताप, सौ संगीता खामकर, निर्मला मोळक आदींनी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे व सौ अनुराधाताई नागवडे यांच्या कार्य कर्तुत्वावर प्रकाश ज्योत टाकत निश्चितपणे सौ अनुराधाताई नागवडे याच आमदार होतील असा विश्वास व्यक्त केला.

</br>

       प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन राव लगड यांनी विद्यालयाच्या स्थापनेपासूनचा लेखाजोखा मांडत विद्यार्थ्यांसाठीच्या विविध स्पर्धा स्पर्धा परीक्षेद्वारे पुढील भविष्य करिअर निवडण्यासाठी विद्यालयातून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते असे सांगून उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापक श्री लगड यांनी स्वागत केले 

</br>

     सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे उपशिक्षक श्री रमजान हवलदार, श्री आप्पासाहेब जगताप, रवींद्र भोंडवे, बाळासाहेब शिंगाडे, आप्पासाहेब नलगे, सचिन शेलार, ठकाजी डगळे, राजेंद्र लगड, अनिल पवार आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले.

</br></br>

       सूत्रसंचालन उपशिक्षिका सौ शकुंतला मोरे मॅडम यांनी केले आभार सौ साधनाताई जगताप यांनी मानले


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.