सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास प्रथम प्राधान्य:सौ अनुराधाताई नागवडे

By : Polticalface Team ,01-02-2024

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास प्रथम प्राधान्य:सौ अनुराधाताई नागवडे

लिंपणगाव (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांची दखल कोण घेत नाही, म्हणून सर्वसामान्यांसाठी झगडत आहे. जेव्हा तुम्हाला भविष्यात कधीही मदत लागेल तेव्हा फक्त एक हाक द्या, असे प्रतिपादन जिल्हा बँक संचालिका सौ.अनुराधाताई नागवडे यांनी महिला पालक मेळाव्यात बोलताना केले.

श्रीगोंदा तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात हळदीकुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रमात माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छत्रपती कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी केले. उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सौ. अनुराधाताई नागवडे पुढे म्हणाल्या की, महिलांचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास असून स्व. बापूंनी समाजसेवेचं व्रत घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित भावनेतून काम केले आणि त्यांनीच दाखवून दिलेल्या मार्गावरून मी मार्गक्रमण करत आहे. सौ.अनुराधाताई नागवडे यांनी सर्व महिलांचे हळदी कुंकू व वाण देऊन औक्षण केले. या मेळाव्यात १५०० पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या.

याप्रसंगी नागवडे कारखान्याच्या संचालिका मंदाकिनी पाचपुते,सुरेखा लकडे, संचालक सुरेश रसाळ, बी.के.लगड, ज्योती खेडकर, सीमा गोरे,अर्चना गोरे, माधवी पाचपुते , गौरी भोस, मीनाताई भोस, वैशाली काकडे,सविता लगड, मीनाक्षी सूर्यवंशी, सारिका रसाळ,भाऊसाहेब बरकडे, बी.के. लगड,ज्योती काकडे,मेघा औटी, धर्मनाथ काकडे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिकांनी विशेष मेहनत घेतली व सर्व अध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी  साथ दिली. तसेच श्रवंतिका उत्सव सुरांचा या संगीतमय सुरेल असणाऱ्या कार्यक्रमाचा महिलांनी आनंद घेतला तसेच सर्व महिलांना स्नेहभोजन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शंकर गवते यांनी केले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी