By : Polticalface Team ,03-02-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता, ०३ फेब्रुवारी २०२४ दौंड तालुक्यातील ग्रेट स्पोर्टस अकॅडमीच्या १३ विद्यार्थी खेळाडू मुलांनी राष्ट्रीय ट्रॉंग ईल मुडो मार्शल आर्ट या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता, राष्ट्रीय टॉंग ईल मुडो या मार्शल आर्ट खेळाच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा २७ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत उत्तर प्रदेश येथील मथुरा वृंदावन या ठिकाणी नुकत्याच पार पडल्या, त्यामध्ये दौंड तालुक्यातील ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करत दैदिप्यमान अशी कामगिरी बजावली असून महाराष्ट्राची मान मार्शल आर्ट क्षेत्रात उंचावली आहे, या राष्ट्रीय स्पर्धेसाठी विविध राज्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये झारखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ, आसाम, ओडिसा, अशा १४ राज्यांमधून ५३० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता, महाराष्ट्रा तर्फे सहभागी झालेल्या खेळाडू पैकी आपल्या दौंड तालुक्यातील १३ खेळाडू मुलांनी महाराष्ट्रचे नेतृत्व केले त्यामध्ये (सुवर्ण पदक) यशश्री भामरे (रौप्य पदक) आशिष अघमकर समृध्दी शिंदे (कांस्य पदक) जानवी पाटील, प्रणिती दुधाळ, कल्याणी शितोळे, क्षितिज कुंभार, यश आढाव, अंश यादव, सार्थक गायकवाड, रोहित जगताप, साद शेख, साईराज राजपूत या विद्यार्थी मुलांनी राष्ट्रीय स्पर्धेत (सुवर्णपदक, रोप्य पदक, आणि कांस्य पदक, मिळविले आहे, ही कामगिरी बजावल्याने संपूर्ण महाराष्ट्र पुणे जिल्हा व दौंड तालुक्याची मान उंचावली आहे, तालुक्यातील ग्रेट स्पोर्टस अकॅडमीच्या कोच व विद्यार्थी मुलांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे,या सर्व खेळाडू मुलांना प्रवीण होले सर यांनी मार्गदर्शन केले, तसेच गणेश घुगे सर समाधान दाने सर, यश बारवकर सर, यांनी प्रशिक्षण दिले होते, राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पथक मिळवल्या बद्दल सौ.रुपाली ताई चाकणकर यांनी पत्राद्वारे ग्रेट स्पोर्टस अकॅडमीचे सर व खेळाडू विद्यार्थी मुलांना शुभेच्छा दिल्या तसेच प्रियांका दाने महाराष्ट्र पोलिस, रुपाली टेंगेल महाराष्ट्र पोलिस किरण शिरसागर महाराष्ट्र पोलिस यांनी ही अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक