स्वप्नांना प्रयत्नांची जोड दिल्यास नक्की यश मिळते.नागवडे इंग्लिश मीडियम १० वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी एपीआय निकम यांचे प्रतिपादन.

By : Polticalface Team ,03-02-2024

स्वप्नांना प्रयत्नांची जोड दिल्यास नक्की यश मिळते.नागवडे इंग्लिश मीडियम १० वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी एपीआय निकम यांचे प्रतिपादन. श्रीगोंदा प्रतिनिधी :     तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डेफोडील्स व कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम मधील इ. १०वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त एपीआय प्रभाकर निकम हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून याप्रसंगी उपस्थित होते."जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी न थकता, न खचता सातत्यपूर्ण प्रयत्न करून स्वतःला सिद्ध करावे व यशस्वी व्हावे असा कानमंत्र त्यांनी याप्रसंगी दिला."विविध उदाहरणे व शेरोशायरी द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली.


निरोप समारंभाचे आयोजन इ. ९ वीच्या विद्यार्थ्यांद्वारे करण्यात आले होते.प्रसंगी १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवास डान्स द्वारे प्रदर्शित करण्यात आला. विविध खेळांचे आयोजन देखील याप्रसंगी करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.


कार्यक्रमासाठी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे निरीक्षक एस पी गोलांडे, सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागवडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीतू दुलानी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


प्रसंगी इ.९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनी अस्सलित इंग्रजी भाषेमध्ये केलेल्या भाषणांनी प्रभावित झाल्याचे सांगून उच्च दर्जाचे शिक्षण नागवडे इंग्लिश मीडियममध्ये देत असल्याबद्दल शालेय प्रशासनाचे एपीआय प्रभाकर निकम यांनी कौतुक केले.



वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी