प्राथमिक शाळा नवी वांगदरी येथे हिंदुस्तान किड्स पशुखाद्य कंपनीकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप
By : Polticalface Team ,03-02-2024
श्रीगोंदा( प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगदरी नवी येथे हिंदुस्तान किड्स पशुखाद्य कंपनीकडून मुलांना मोफत वही वाटप करण्यात आले मागील वर्षापासून गावातील हनुमंत चोरमले यांच्या मदतीने कंपनीचे सेल्स मॅनेजर विश्वजीत जगताप व गणेश वाघमोडे यांच्या सहकार्याने गोरगरीब सामान्य कुटुंबासह सर्व मोफत व यांचे वाटप झाल्यानेमुलांच्या चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळाला याप्रसंगी मुख्याध्यापक आबासाहेब जगताप यांनी हिंदुस्तान फीड्स कंपनीचे दान सतपात्री झाल्याचे सांगितले योग्य ठिकाणी देशाची भावी पिढी जेथे घडते त्या तळागाळातील मुलांसाठी कंपनीचा धर्मादाय फंड चा वापर वस्तू रूपाने केल्याचे समाधान वाटले याप्रमाणेच मोठमोठ्या कंपन्यांनी सुद्धा ग्रामीण भागातील शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले याप्रसंगी गावचे सरपंच संजय काका नागवडे यांनी देखील समाधान व्यक्त केले व हा उपक्रम राबवणारे कंपनी व गावातील सामाजिक कार्यकर्ते हनुमंत चोरमले यांचे गावाकडून विशेष आभार मानले याबरोबरच वेगवेगळ्या कंपन्या व कारखान्यांशी संपर्क साधून ग्रामीण शाळांसाठी सीएसआर फंडातून रक्कम देणाऱ्या दात्यांना गावाकडे येण्याचे आवाहन केले व पाठपुरावा करण्याचा शब्द दिला याप्रसंगी शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष हनुमंत हराळ योगेश शेठ नागवडे बाळासाहेब हंडाळ बाबुराव टेंगले चोरमले शिक्षक वृंद बालमित्र उपस्थित होते मान्यवरांचे आभार श्रीमती वनिता नलगे /जगताप मॅडम यांनी मानले
वाचक क्रमांक :