By : Polticalface Team ,04-02-2024
बारामती प्रतिनिधी : मोफत आरोग् तपासणी शिबिर ग्रामपंचायत कार्यालय गोजुबावी ता. बारामती जि. पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या वतीने गवंडी, बिगारी ,सेंटरिंग कामगार, प्लंबर, पेंटर, व इतर कामगार नोंदणीकृत कामगार व नूतनीकरण कामगार यांच्यासाठी व यांच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते. यावेळेस Dr नयनेश जी मुंडे साहेब आरोग्य अधिकारी,साक्षी भिलारे, आयेशा शेख, विनायक वाघमोडे , तांबोळी आरोग्य सेवक, यांच्यामार्फत कामगारांच्या तपासण्या करण्यात आल्या व टॅबलेट, गोळ्या, औषधे,कामगारांना वाटप करण्यात आल्या. थोयरॉईड,
,व्हिटॅमिन बी,व्हिटॅमिन D, VDRL,HIV HBSAG,HCV,CEA,लोहाचे
प्रमाण
रक्ताचे प्रमाण
Calcium
आम वात
प्रोटीन
मलेरिया
ESR
किडनी तपासणी
लिव्हर तपासणी
रक्तातील चरबीचे प्रमाण
सांधी वात
Electrolyte
साखर
कामगारांचे तपासणी करण्यात आली तसेच कामगारांना नवीन नोंदणी करण्यासाठी अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यात आल्या कामगारांना मिळणाऱ्या योजनाची माहिती सांगण्यात आली कामगारांना योजना मिळवून देण्यासाठी प्रवीण (सोनु )माकर प्रयत्न करणार आहेत. कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले, यासाठी कामगार कुटुंबाचे आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच 150 हून अधिक कामगार शिबिरासाठी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
प्रमुख उपस्थिती जावेद मुलानी तलाठी गोजुबावी, सरपंच प्रतीक्षा भोसले, उपसरपंच सुनिता गावडे, दुर्गादास भोसले उपसरपंच, याकुब भाऊ शेख तंटामुक्ती अध्यक्ष, पंडित गरगडे, मोहन खांडेकर, नवनाथ थोरात, विजय कदम, रंजीत कोकरे, सचिन भोसले, सर्व कामगार व कॉन्ट्रॅक्टर उपस्थितीत होते.
मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन– प्रवीण (सोनु)माकर कामगार संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी केले होते.
वाचक क्रमांक :