By : Polticalface Team ,06-02-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी )
शुक्रवार दिनांक ९ रोजी श्रीगोंदा येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची रात्री आठ वाजता जाहीर सभा होणार आहे . सभेचे नियोजन करण्यात आले आहे व सभेची जय्यत तयारी चालू आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रात ठीक ठिकाणी जाहीर सभा घेऊन आरक्षणाविषयी मराठा समाजामध्ये जनजागृती करीत आहे. आरक्षणासाठी त्यांनी आजवर राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत त्याप्रमाणे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये येथे जामखेड श्रीगोंदा रोड आवटेवाडी दि.९ रोजी शुक्रवारी सायंकाळी ८.०० वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेचे नियोजन अंतिम टप्प्यात असून त्यापार्श्वभूमीवर सभेची जय्यत तयारी चालू असल्याचे चित्र येथे दिसून येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मनोज जरांगे पाटील काम करतायत मनोज तसे मूळचे बीडचे मातोरीचे पण काही वर्षांपूर्वी ते जालन्याच्या अंबड मधील अंकुश नगरात स्थायिक झाले. जरांगे पाटलांच्या घरची परिस्थिती बेताचीच पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्त बसू देत नाही. अगदी स्वतःच्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं यासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले आमरण उपोषणे केली रस्ता रोको केले..मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मनोज जरांगे पाटील काम करत आहेत.मनोज तसे मूळचे बीडचे मातोरीचे पण काही वर्षांपूर्वी ते जालन्याच्या अंबड मधील अंकुश नगरात स्थायिक झाली . जरांगे पाटलांच्या घरची परिस्थिती बेताचीच पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्त बसू देत नाही. अगदी स्वतःच्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं यासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले आमरण उपोषणे केली रस्ता रोको केले.
अंदाजे पन्नास ते साठ एकर जागेत सभेचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्त्या भारती इंगवले यांनी दिली . तसेच तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी अशी माहिती माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
पार्किंगची व्यवस्था चाळीस ते पन्नास एकरामध्ये नियोज करण्याचे काम चालू आहे . तसेच सभेसाठी ग्राउंड ५० ते ६० एकराची स्वच्छता करण्याचे काम चालू आहे . व जेसीबीच्या साह्याने ग्राउंड स्वच्छ करण्याचे काम चालू आहे. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने तरुण वर्ग उपस्थित राहून जोरदार तयारी करत असल्याचे चित्र दिसत आहे.
वाचक क्रमांक :