महाराजा कॉलेज बॉडी बिल्डर गणेश भोसला अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये ब्राँझ पदक

By : Polticalface Team ,07-02-2024

महाराजा कॉलेज बॉडी बिल्डर गणेश भोसला अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये ब्राँझ पदक

         लिंपणगाव (प्रतिनिधी) दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी कालिकत येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ  बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये प्रथमच गणेश बोस याने ब्राँझ मेडल प्राप्त केले. या वर्षीचा  नगर श्री व विद्यापीठ श्री बहुमान त्याने मिळवला. गणेश श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला गावाचा रहिवासी असून त्याने प्राथमिक शिक्षण गावात पूर्ण केले व पदवी पर्यंतचे शिक्षण महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात पूर्ण करून याच महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. कनिष्ठ महाविद्यालयात असतानाच त्याला कुस्तीची आवड होती त्यामध्ये त्याने जिल्हा व विभागीय स्तरावर यश प्राप्त केले होते. त्यामुळे त्याला सहाजिकच व्यायामाची आवड होती. त्याने शरीर पिळदार स्नायूंचे असावे म्हणून जिमचा व्यायाम सुरु केला. जिमच्या व्यायामामुळे बॉडी बिल्डींग मध्ये आवड निर्माण झाली व बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यश प्राप्त करण्याचे ध्येय ठरवून राष्ट्रीय पंच किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथे त्यांच्या घरी राहून सराव सुरू केला. या स्पर्धेसाठी त्याच्या कुटुंबातील आजी-आजोबा, आईवडील व नातेवाईकांची खंबीर साथ मिळाली तसेच महाविद्यालयाच्या शा.शिक्षण संचालिका बागुल कल्पना व क्रीडा शिक्षक संजय डफळ यांच्या मार्गदर्शनामुळे  गणेश बोस याचे ध्येय प्रत्यक्ष पूर्ण झाले.

       या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन आमदार बबनराव पाचपुते,  रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुल दादा जगताप, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महावीर पटवा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुदाम भुजबळ, जिमखाना विभाग प्रमुख प्रा.संजय अहिवळे,  ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे पर्यवेक्षक रत्नाकर झिटे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी