आम्ही पोलीस आहोत, तुमची झडती घ्यायची आहे असे सांगून जबरी चोरी करणारे महाठक दौंड पोलिसांच्या जाळ्यात..

By : Polticalface Team ,07-02-2024

आम्ही पोलीस आहोत, तुमची झडती घ्यायची आहे असे सांगून जबरी चोरी करणारे महाठक दौंड पोलिसांच्या जाळ्यात..  दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,दौंड ता ०७ फेब्रुवारी २०२४ दौंड शहरातील महाठकांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, आम्ही पोलीस स्टाफ आहोत.. आम्हाला तुमची झडती घ्यायची आहे असे सांगून परप्रांतीयांना त्यांनी अडवले. मात्र आमची झडती इथे नको पोलीस ठाण्यात घ्या असे म्हणल्यावर त्यांना मारहाण करून मोबाईल व रोकड जबरीने घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेला तर ठार करू असे धमकावणाऱ्या दोन महाठकांच्या दौंड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.या बाबत सविस्तर माहिती अशी, दि.३ रोजी सकाळी १० वाजता दोन परप्रांतीय युवक दौंड रेल्वे स्थानकातून बस स्थानकाकडे जात असताना दोन इसमांनी मोटार सायकलवर येऊन त्यांना अडवले व पोलीस असल्याचे सांगून झडती घेऊन त्यांच्या जवळचा एक मोबाईल व रोख रक्कम असा अठरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला.

 त्यांनंतर पोलिसांना कळवल्यास जीवे मारू अशी धमकी देत मारहाण केली. या बाबत घडलेल्या प्रकारा बाबत मुनहेन्द्रसिंग कोमलसिंग नरवारिया (रा.शिरूर,पुणे) याने दौंड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ३९४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेची खबर दौंड पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना कारवाईच्या तात्काळ सूचना दिल्या. गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती वरून दि.६ रोजी दौंड शहरातून पानसरे वस्ती व वडार गल्ली येथून दोन इसमांना दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची नावे अक्षय अशोक देवकर (रा.वडारगल्ली दौंड) व युवराज पांडुरंग बनकर (रा.पानसरे वस्ती दौंड) अशी आहेत. त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यात जबरदस्तीने चोरी केलेले साहित्य त्यांचेकडे असल्याचे सांगितले.ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक महेश आबनावे, गुन्हेशोध पथकाचे पोलिस अंमलदार पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, पोलीस नाईक विशाल जावळे, आदेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते आदींनी केली आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष