किल्ले धर्मवीरगड ते रायगड धर्मवीर रथयात्रा

By : Polticalface Team ,08-02-2024

किल्ले धर्मवीरगड ते रायगड धर्मवीर रथयात्रा

    श्रीगोंदा ( प्रतिनिधी):-छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून श्रीगोंदेकरांचे इमान रायगडाच्या मातीशी राहिलं आहे. श्रीगोंदे तालुक्यांतील एकमेव किल्ला धर्मवीरगड.पांडे पेडगावचा किल्ला, बहादूरगड या नावानेही ओळखला जातो.

या किल्ल्याच्या परिसरात खूप मोठा इतिहास घडला आहे.छत्रपती संभाजी महाराजांवरील अनन्वित अत्याचाराचा साक्षीदार हा किल्ला आहे.१फेब्रु. १६८९ रोजी पकडले गेले. त्यानंतर परत कधीच रायगड भेट झाली नाहीं. 

शिव राज्याभिषेक सोहळयाचा खर्च भरुन काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बहादुर खानची केलेलीं फजिती. "पेडगावचा शहाणा" म्हणून इतिहास प्रसिद्ध आहे.


 गडकिल्ले संवर्धन व श्रीगोंदे तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जतन करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या वतीने यावर्षी प्रथमच किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड अशी रथयात्रा  आयोजन केले आहे. दिनांक १० व ११ फेब्रुवारी रोजी ही रथयात्रा दोन दिवसांत किल्ले रायगड येथिल महादरवाजा येथे पोहचेल.महादरवाजा  येथेच समाप्त होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले जाईल.सहभागी सर्वांना सर्व गडाची माहिती सांगितली जाईल. श्रीगोंदे आणि रायगड ऋणानुबंध उलगडून सांगितला जाईल.

 दोन्ही राजांचा संबंधाने श्रीगोंदा व पेडगाव इथे इतिहास घडलाय. इतिहास जपणे आपले कर्तव्य आहे म्हणून जाणार आहे रथ यात्रा! छत्रपती संभाजी महाराजांचा धीरोदात्त शौर्याचा साक्षीदार किल्ले धर्मवीरगड. शिघ्रकवी कविकलश यांची  शेवटची  इतिहास प्रसिद्ध रचना "यावन रावण की सभा" किल्ले धर्मवीरगड येथे  घडून आली. श्रीगोंदेकरांचे इमान नेहमीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी होते. म्हणूनच राजधानी रायगडाच्या एका टोकाला छत्रपती शिवाजी महाराजांनी "श्रीगोंदे टोक" नाव दिले होते.श्रीगोंदे आणि रायगड ऋणानुबंध जपणे श्रीगोंदेकरांचे कर्तव्य आहे म्हणून जाणार आहे किल्ले रायगड येथे धर्मवीर  रथ यात्रा.

अशी माहिती शिवदुर्गचे उपाध्यक्ष डॉ चंद्रशेखर कळमकर यांनी दिली.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.