श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

By : Polticalface Team ,09-02-2024

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन लिंपणगाव (प्रतिनिधी) -दि.१० फेब्रुवारी पासून श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मोडी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. इतिहास विभाग व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण वर्ग १० दिवस आयोजित करण्यात येत आहेत. महाराष्ट्राचा इतिहास ज्ञात करून घेण्यासाठी मोडी लिपीची आवश्यकता आहे. मराठी भाषा उदयास आल्यापासून मोडीलिपीचा विकास झाला. यादव कालखंडापासून ते ब्रिटिश कालखंडापर्यंत सर्व मराठी अभिलेख मोडीलिपीत आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय सोयीसाठी देवनागरी लिपीचा स्वीकार केला तेव्हापासून मोडी लिपीचा ह्रास होण्यास सुरवात झाली. मराठेकालीन व ब्रिटिशकालीन सरकारी दप्तर मोडीलिपीत असल्याने महाराष्ट्राचा इतिहास उजागर करायचा असेल तर मोडीलिपीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे श्री छञपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा इतिहास विभाग प्रत्येक वर्षी मोडी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करून विद्यार्थ्याना मोडीलिपीची ओळख करून देत आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी दिली. महाविद्यालयांतील विद्यार्थी व नागरिकांना मोडीलिपीचे ज्ञान व्हावे यासाठी हे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. मोडी प्रशिक्षक म्हणून इतिहास विभाग प्रमुख प्रा.सचिन धेंडे व प्रा.डॉ. राजेश बाराते हे काम पाहणार आहेत. सदर प्रशिक्षक महाराष्ट्र शासन प्रमाणीत मोडी वाचक आहेत. मोडीलिपी प्रशिक्षनासाठी प्रा.किरण नागवडे,प्रा.प्रवीण पिसे, डॉ.धर्मनाथ काकडे,डॉ.मुकुंद भोस यांच्याशी संपर्क करावा.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी