अफाट जिद्दीच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करा : प्रियंका अजय गाडेकर (कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई)

By : Polticalface Team ,10-02-2024

अफाट जिद्दीच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करा : प्रियंका अजय गाडेकर (कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई)

लिंपणगाव( प्रतिनिधी)- अफाट परिश्रम, जिद्द आणि संस्कारांच्या आधारावर माणूस स्वतःच्या आयुष्याचे सोने करू शकतो आणि त्यातूनच नवा पिढी निर्माण होईल आणि हीच पिढी खऱ्या अर्थाने देशाला सक्षम रीतीने पुढे घेऊन जाऊ शकेल असे असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या मुंबई मंत्रालयातील नवनियुक्त कक्ष अधिकारी प्रियांका अजय गाडेकर यांनी प्रमुख अतिथी म्हणून व्यक्त केले.



रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा संकुलातील महादजी शिंदे विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे शुभचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस यांनी संस्कारांची शिदोरी आणि रयत शिक्षण संस्थेतील संस्कार रयतचा इतिहास ,संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेला व समाजाला मार्गदर्शक ठरतील असे उपक्रम रयतच्या माध्यमातून सातत्याने घेतले जातात त्या उपक्रमांना वर्तमानपत्र तसेच वृत्तवाहिन्यातून प्रसिद्धी मिळाली पाहिजे असे भाष्य केले.


 तसेच तालुक्याचे आमदार व पूर्व मंत्री बबनराव पाचपुते यांनी बोलताना विद्यार्थ्यांनी नवशिखरे पादाक्रांत करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून काम केले पाहिजे, अंधश्रद्धा न बाळगता प्रयत्नशील राहून संत विचाराने काम केले तर मानव उत्कृष्ट जीवन प्राप्त करू शकतो, असे प्रतिपादन केले.


इयत्ता दहावीचा विद्यार्थी दीप लगड, बारावी मधील कु. सोफिया शेख यांनी विद्यालयाबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.


यावेळी उपनगराध्यक्ष ज्योती खेडकर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य हभप कुंडलिकराव दरेकर यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


यावेळी विद्यालयातील तालुकास्तर, जिल्हास्तर राज्यस्तरावर विशेष गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व मेडल देऊन सन्मान करण्यात आला. गुरुकुल, कला, क्रीडा,वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, एन्एमएमएस परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, आरटीएस, दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी,   अशा सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी २४६ गुणवंतांना ट्रॉफी, मेडल व नोटबुक देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी मंचावर नगरसेविका मनिषा लांडे, सौ. लाढाणे, नगरसेविका सीमा गोरे, माजी  उपनगराध्यक्ष राजु गोरे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाजीराव कोरडे, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य महावीर पटवा, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव जरे, उपप्राचार्य शहाजी मखरे प्राचार्य दिलीप भुजबळ प्राचार्य गीता चौधरी तसेच माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव राजेंद्र खेडकर,  बापूराव औटी,सौ रुपाली दरेकर

बी.के. राहींज, सुधाकर जानराव आदी मान्यवर उपस्थित होते.

या विविध दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाला चार स्टील बाक भेट दिले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने मिष्टान्न भोजन देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेच्या उत्तरे विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे , सूत्रसंचालन विलास लबडे आणि सुधीर साबळे, आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे यांनी केले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.