श्रीगोंदा एमआयडीसी व साकळाईची घोषणा म्हणजे विखे पिता पुत्रांचा चुनावी जुमला -- घनःशाम शेलार

By : Polticalface Team ,10-02-2024

श्रीगोंदा एमआयडीसी व साकळाईची घोषणा म्हणजे विखे पिता पुत्रांचा चुनावी जुमला  -- घनःशाम शेलार


       लिंपणगाव (प्रतिनिधी) -- खासदार डाॅ. सुजय विखे पाटील हे 23 मे 2019 रोजी लोकसभा निवडणुकीत विजयी झाले खासदारकीच्या  गेल्या चार साडेचार वर्षाच्या कालाखंडात त्यांना श्रीगोंदा तालुक्यातील एमआयडीसी व श्रीगोंदा-नगर तालुक्याला वरदान ठरणा-या साकळाई योजनेची आठवण झालेली नव्हती मात्र लोकसभेच्या निवडणुका समोर आल्यानंतर साकळाई उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण व एमआयडीसीला तत्वता मंजुरी अशा फसव्या घोषणा हा विखे पिता पुत्रांचा चुनावी जुमला आहे ही जनतेच्या डोळ्यात धुळफेक आहे असा घणाघाती आरोप  घनःशाम शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

 श्री शेलार यांनी पुढे म्हटले आहे की लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल 2019 ला पार पडली या निवडणुकीचा निकाल 23 मे 2019 रोजी जाहीर झाला त्यात डॉ. सुजय विखे पाटील हे खासदार झाले त्यावेळी राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकार कार्यरत होते लोकसभा निवडणुकीच्या  प्रचारासाठी आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी डाॅ. सुजय विखे यांना खासदार करा मी साकळाई योजनेचे पाणी श्रीगोंदा व नगर तालुक्याला देईल अशी घोषणा केली होती विखे खासदार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे सहा महिने राज्याचे मुख्यमंत्री होते तर श्री राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यात कॅबिनेट मंत्री होते खरंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली पाहिजे याची जाण व भान  खासदारांना असायला पाहिजे होतं आणि त्यांनी त्या प्रश्नांचा प्रामाणिकपणाने पाठपुरावा करायला पाहिजे होता मात्र त्या कालखंडामध्ये आपण दिलेल्या कुठल्याही आश्वासनाच्या बाबतीत त्यांनी पाठपुरावा केलाच नाही उलट 1997 साली मी पाठपुरावा करून साकळाई उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण पूर्ण करून त्यावेळी रू.१२८ कोटीची योजना मंजुरीसाठी शासन दरबारी गेली होती मात्र त्यावेळी या योजनेला जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व काही लोकप्रतिनिधींनी विरोध केला म्हणून ती योजना मंजूरी विना पडून राहीली तिला मंजूरी न देता  लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर  काही महिन्यापूर्वी त्यांनी लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करण्यासाठी हेतूपुरस्सर पुन्हा साकळाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाची घोषणा केली ही घोषणा म्हणजे सरळ सरळ लोकांच्या भावनांशी अत्यंत दुर्दैवी खेळ असून हा खेळ तालुक्यातील जनतेने ओळखलाय याची प्रचिती त्यांना साखर व दाळ वाटप कार्यक्रमात आली.

त्यामुळे विखे पिता पुत्रांनी  डॅमेज कंट्रोल म्हणून नवीन नौटंकी सुरू करून पुन्हा दिशाभूल आणि धुळफेक करत श्रीगोंदा एमआयडीसीला तत्वता मंजुरी अशा प्रकारची फसवी घोषणा केली आहे ही त्यांची लोकसभा निवडणुकीसाठीची केविलवाणी धडपड आहे त्यांना जनतेने दिलेली संधी त्यांनी मातीमोल केली असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ते कोणतेही भरीव काम करू शकले नाहीत त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर केलेल्या फसव्या घोषणांना जनता फसणार नसून अत्यंत निष्क्रीय व अयशस्वी खासदारला आगामी निवडणुकीत लोक धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत असा घणाघात श्री शेलार यांनी  केला.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.