By : Polticalface Team ,11-02-2024
                           
              लिंपणगाव (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटी ही जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर यांची मातृसंस्था समजली जाते. या संस्थेत ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा भाऊसाहेब कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक काटकसरीने कारभार करत निश्चितच ही संस्था राज्यात नावलौकिकास पात्र ठरल्याचे गौरवोद्गार नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी व्यक्त केले.
श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात माध्यमिक शिक्षक सोसायटी श्रीगोंदा शाखेच्या वतीने संस्थेच्या सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान व सभासद पाल्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस होते
व्यासपीठावर नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा भाऊसाहेब कचरे, संस्थेचे संचालक आप्पासाहेब शिंदे, नितीन कराळे, महेंद्र हिंगे, नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे श्रीगोंदा ग्रामीणचे सचिव कुंडलिकराव भोसले छत्रपती शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड, प्राचार्य सतीश चंद्र सूर्यवंशी, जुनी पेन्शनचे राज्य समन्वयक सुनील भोर मुख्याध्यापक आप्पासाहेब वागस्कर, , देवराम दरेकर, रमजान हवालदार, बापूसाहेब गायकवाड, राजेंद्र बारगजे, रमजान सय्यद, मधुकर नागवडे, उद्धव गायकवाड, बाजीराव कोरडे, देविदास खेडकर, श्री विलास शितोळे, शिक्षकेतर संघटनेचे सुनील म्हस्के, अण्णासाहेब चिखलठाणे, शाखा अधिकारी वैभव चौगुले आजी- माजी मुख्याध्यापक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना श्री नागवडे पुढे म्हणाले की, प्रा कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेच्या माध्यमातून सभासदांना वेळोवेळी विविध प्रकारचा लाभ देत असताना शहीद जवानांच्या कुटुंबांना आर्थिक मदत, तसेच कन्यादान पुत्रदान योजना, कर्जावरील अल्प व्याजदर, निवृत्त सभासदांचा कृतज्ञता सन्मान, मयत सभासदांचे संपूर्ण कर्जमाफी योजना प्रभावीपणे राबवून गुणवंत पाल्यांचे देखील कौतुक करत या संचालक मंडळाने उत्तम प्रकारे निर्णय घेतले. हा निर्णय प्रेरणादायी असून, त्यामुळेच राज्यात ही संस्था ही संस्था नावलौकिकास पात्र ठरल्याचे नागवडे यांनी यावेळी सांगितले.
संस्थेचे संचालक आप्पासाहेब शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, संस्थेने कोविड काळापासून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पारितोषिक वितरण व सभासदांचा सन्मान सोहळा सुरू केला. पूर्वी या संस्थेचे फक्त 60 सभासद होते. आता अकरा हजार पाचशे सभासद आहेत. त्यामुळे सभासद संख्या लक्षात घेता रयत बँकेप्रमाणे या संस्थेतही 50 लाखापर्यंत कर्ज मर्यादेची अपेक्षा व्यक्त करत सभासदांच्या पैशातूनच संस्था विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा भाऊसाहेब कचरे यावेळी म्हणाले की, माध्यमिक सोसायटीने 994 कोटीचे कर्ज वाटप केले. 2006 पासून सेवानिवृत्तांना निवृत्तीनंतर आर्थिक मदत केली जाते. संस्था ही एक काचेचे भांडे समजले जाते. संस्थेने सभासद हितासाठी 18.53% वरून सात टक्क्यापर्यंत व्याजदर आणला. संस्था मात्र बँकेकडून 11.50 टक्क्याने कर्ज घेते.हे केवळ संचालक मंडळाच्या पारदर्शक काटकसरीच्या कारभारामुळेच शक्य होत आहे. असे सांगून प्रा कचरे आणखी पुढे म्हणाले की, शेअर्सवर नऊ टक्के व्याज दर देते. यापुढे टप्प्याटप्प्याने कर्ज मर्यादा वाढवली जाईल. टर्नओव्हर नुसार ऑडिट फी द्यावी लागते. संस्था मोठी होते त्यानुसार ऑडिट फी देखील वाढली जाते. सभासदांचा संचालक मंडळावर नेहमीच विश्वास व सहकार्य लाभल्यामुळेच हे शक्य होत आहे. असे प्रा कचरे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी बीआरएसचे नेते घनश्याम शेलार यावेळी बोलताना म्हणाले की, प्रा. भाऊसाहेब कचरे यांचे संस्थेला उत्तम मार्गदर्शन लाभल्यामुळे सभासद व संस्थेची मोठी प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. संस्थेला नफा होण्यापेक्षा सभासदांना लाभ कसा मिळेल यासाठी यापुढेही संचालक मंडळाने प्रयत्नशील राहावे, असे सांगितले.
याप्रसंगी शिक्षक संघाचे सचिव रमजान हवलदार, श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक रामदास झेंडे आदींनी संस्था व सभासदांचे हितासाठी मौलिक सूचना यावेळी मांडल्या.
अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब भोस यावेळी म्हणाले की, संस्थेला चांगले व पारदर्शी नेतृत्व लाभले तर ही संस्था निश्चितपणे नावारूपास येते. संस्थेत विचाराने विरोध असायला हवा, या संस्थेत संचालक मंडळाकडून अतिशय चांगले योजना राबवल्या जातात, ही अभिमानास्पद असून, पदाधिकारी म्हणून काम करत असताना प्रत्येकाने सक्षमपणे कामाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून देण्याची आवश्यकता आहे असे सांगितले.
प्रास्ताविकात संस्थेचे माजी उपाध्यक्ष अशोकराव आळेकर यांनी प्रा कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या वाटचालीचा लेखाजोखा यावेळी मांडला. यावेळी सूत्रसंचालन प्रा. शंकर गवते यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव काटे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष