By : Polticalface Team ,11-02-2024
श्रीगोंदा (प्रतिनिधी)- सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे व जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे यांनी आज पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार यांच्या पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष ना सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी 11 फेब्रुवारी रोजी प्रवेश केला. दरम्यान काही दिवसांपूर्वीच कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे व जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे यांनी नुकतेच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचे राजीनामे दिले. त्याचवेळी श्री नागवडे व सौ नागवडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा दादा पवार यांच्या पक्षांमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजले. तशी चर्चा देखील जिल्ह्यात प्रसार माध्यमांद्वारे पसरली गेली होती. तर 19 जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे दिवंगत सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त उपस्थित राहिले होते. त्याचवेळी श्री राजेंद्र नागवडे व सौ अनुराधाताई नागवडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित मानला गेला होता. तशी चर्चा देखील नागवडे समर्थकांमधून होताना दिसली.
दरम्यान या पक्षप्रवेशा दरम्यान नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, युवक नेते दीपक शेठ नागवडे, राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा, धनसिंग पाटील भोईटे, राकेश पाचपुते, सखाराम जगताप, ज्ञानदेव गवते, आप्पासाहेब धायगुडे, बंडू जगताप, शरदराव नवले, आणि आसिफ इनामदार आदींचा देखील उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्या पक्षाकडून सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उमेदवारीवर देखील शिक्का मोर्तब झाल्याचे समजते. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला श्रीगोंदा तालुक्यातून अनुराधाताई नागवडे यांच्या माध्यमातून एक सक्षम व कर्तबगार सुसंस्कृत महिला उमेदवार लाभल्याने पहिल्यांदाच श्रीगोंदा तालुक्यात महिला आमदार म्हणून सौ अनुराधाताई नागवडे यांना संधी मिळणार आहे. तर सौ अनुराधाताई नागवडे यांनी देखील श्रीगोंदा तालुक्यातील उर्वरित सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंचे तालुक्याच्या उर्वरित विकासाचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनाशी जिद्द कायम ठेवल्याचे त्यांच्या नगर- श्रीगोंदा तालुक्याच्या संपर्क दौऱ्यावरून दिसून येत आहे. दरम्यान तालुक्यातील नागवडे समर्थक देखील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.
वाचक क्रमांक :