By : Polticalface Team ,12-02-2024
श्रीगोंदा (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा एन एम एम एस परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लागला असून, या परीक्षेसाठी 26 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. त्यापैकी अकरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे या विद्यालयाचे सारथीला नऊ विद्यार्थी यादीत चमकले आहेत. या विद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर व लोणी व्यंकनाथ विद्यालयाचे तज्ञ मार्गदर्शक शिक्षक श्री संतोष शिंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रघुनाथ भापकर यावेळी बोलताना म्हणाले की, आपण एक डिसेंबर पासून या विद्यालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर विद्यालयाचे विद्यार्थी गुणवंत कसे होतील याकडे आपण विशेष लक्ष दिले . त्याबरोबरच विद्यालयाचा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही च्या माध्यमातून केंद्रित केला. प्रसंगी शालेय शिस्त, बालआनंद मेळावा, वृक्ष संवर्धन, वर्ग सजावट, वृक्ष सजावट, तसेच या विद्यालयाचा चित्रकला ग्रेड परीक्षेचा देखील 100% निकाल लागला. श्री भापकर आणखी पुढे म्हणाले की, विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून विद्यालयाचा शिक्षक वर्ग अगदी तणमणधनाने विद्यार्थी घडवण्याचे काम करतात. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांचे या कामी अगदी मौलिक असे सहकार्य लाभत आहे. विद्यार्थ्यांना मुक्त व आनंदी शिक्षण कसे देता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मुख्याध्यापक भापकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांची जिल्हा शिक्षकेतर महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल व एसएससी परीक्षेचे विषय शिक्षक तज्ञ मार्गदर्शक श्री संतोष शिंदे सर यांनी विद्यालयातील एसएससी मार्च 2024 साठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे योग्य असे मार्गदर्शन व परीक्षे संदर्भात मौलिक सूचना यावेळी केल्या. या प्रित्यर्थ या दोन्हीही मान्यवरांचा विद्यालयातर्फे मुख्याध्यापक श्री रघुनाथ भापकर सर यांनी सन्मान केला. या कार्यक्रमास विद्यालयाचे शिक्षक सर्वश्री लष्कर बी डी, विकास गायकवाड, कदम सर, कळमकर सर, दिवटे मॅडम, बांदल सर, शेलार सर आदींसह विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :