आदिवासी पारधी समाजाला समान न्याय आणि संधी मिळणे साठी अर्ध नग्न आंदोलन करणार. - संतोष भोसले

By : Polticalface Team ,13-02-2024

आदिवासी पारधी समाजाला   समान न्याय आणि संधी मिळणे साठी अर्ध नग्न आंदोलन करणार.                          - संतोष भोसले

    श्रीगोंदा ( प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब सिध्दरामन सालिमठ यांना सहारा सर्वांगीण विकास संस्था आणि चिंतामणी महीला स्वयंसहाय्यता समूह च्या वतीने निवेदन देण्यात आले.पर्यंत आमच्यावर नेहमीच अन्याय झालेला आहे. काहीना तुपाशी आणि काहींना उपाशी हे आता आम्ही मुळीच मान्य करणार नाही . काही लोकांचे असंविधानिक मार्गाने बचत गटाचे प्रकरण मंजूर करण्याचे षडयंत्र एकात्मिक आदिवासी विकास विभाग राजुर कडून चालू आहे ते न करता सर्वांना समान न्याय आणि संधी देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

एकात्मिक आदिवासी विकास विभाग फक्त ठरावीक लोकांसाठीच काम करते का ? अशा कोणत्या गोष्टी आहेत की एकात्मिक आदिवासी विकास विभाग राजूरच्या शासकीय अधिकाऱ्यांना ते ऐकायला भाग पाडतात आमचेच प्रकरण मंजूर करा ? हे जर असच चालत राहिलं तर तमाम पारधी समाजाचं काय होणार.आणि मग प्रश्न पडतो की एकात्मिक आदिवासी विकास विभाग हे नेमके कोणासाठी आहे ? आदिवासी पारधी समाजातील दीनदुबळ्या गरीब, दारिद्र्य रेषेत आणि भूमिहीन असणाऱ्या लोकांसाठी की या ऑफिस मध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या फक्त श्रीमंत लोकांसाठी की फक्त पुढाऱ्यांसाठीच हा प्रश्न नेहमीच पडत आहे असे बोलताना सहारा सर्वांगीण विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष भोसले म्हणाले. आमची परिस्थिती नाही वेळोवेळी या कार्यालयात येण्याची आणि याचाच गैरफायदा कार्यकर्त्यांसह सर्व अधिकारी सुद्धा घेत आहेत. आता समान न्याय आणि समान संधी मिळालीच पाहिजे असे बोलताना सहारा सर्वांगीण विकास संस्थेच्या सचिव छाया भोसले म्हणाल्या.

राहायला व्यवस्थित घर तर नाहीच पण आदिवासी पारधी समाजातील हे कुटुंब अनेक लोकांचा कर्जाखाली डुबलेले आहेत. वयाच्या 50, 60 वर्षापर्यंत यांचे आयुष्य लोकांचे कर्ज फेडण्यात गेले. यांचा आणि एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांचा आज पर्यंत काहीच संबंध राहिला नाही. अनेक प्रकरणे करून आणि सत्तावीस वेळा एकात्मिक आदिवासी विकास विभाग राजूरला जाऊन सुद्धा यांच्या हाती आजपर्यंत काहीच लागलेले नाही.  आमदार, खाजदार, कलेक्टर, अश्या अनेक प्रतिष्ठित व्यक्ती कडून  दबाव आणून आमच्या सारख्या गरीब लोकांचे प्रकरणे कचऱ्यात टाकायला लावतात आणि आमच्या सारख्या गरीब लोकांचा बळी देतात.

 एकात्मिक आदिवासी विकास विभाग गरिबांसाठी नाहीच ते फक्त लुबाडणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्या, श्रीमंत लोकांसाठीच आणि अधिकाऱ्यांसाठीच आहे असा सवाल अपर्णा काळे यांनी केला. 

 आमचे चिंतामणी स्वयंसहायता समूहचे प्रकरण नामंजूर केले तर आम्ही कलेक्टर ऑफिस अहमदनगर आणि एकात्मिक आदिवासी विकास विभाग राजुर कार्यालयासमोर आदिवासी पारधी समाजाच्या वतीने अर्ध नग्न  आंदोलन करणार असल्याची माहिती सहारा सर्वांगीण विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष भोसले यांनी दिली.

यावेळी सहारा सर्वांगीण विकास संस्थेच्या सचिव व चिंतामणी महिला स्वयंसहायता समवाच्या अध्यक्षा छाया भोसले, अपर्णा काळे ,रेवण भोसले ,चिमी भोसले, भद्र्या काळे, काजल काळे, पुष्पा काळे, अणेस काळे, राणी काळे, अंतुस काळे आदी उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.