By : Polticalface Team ,13-02-2024
श्रीगोंदा ( प्रतिनिधी) तालुक्याच्या राजकरणात प्रभावी समजल्या जाणाऱ्या मढेवडगांव या सहकारी सेवा संस्थेचे तत्कालीन चेअरमन प्रमोद शिंदे यांनी लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक लढवली होती त्यात बाजी मारून सरपंच पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर व व्हा.चेअरमन भगवान कुरूमकर यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्या कारणाने नवीन चेअरमन व व्हा. चेअरमन यांची आज नव्याने निवड करण्यात आली. गावातली सेवा संस्थेवर नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र (दादा)नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे संचालक सुभाष (काका) शिंदे यांचे एक हाती वर्चस्व असल्या कारणाने निवड ही बिनविरोध होणारच होती. परंतु रिक्त झालेल्या जागेवर नेते कोणाला संधी देतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. चेअरमन पदासाठी एकमात्र प्रकाश मारुती उंडे यांचा अर्ज दाखल झाला त्यांना सूचक म्हणुन शरद शिंदे तर अनुमोदक म्हणुन बापुसाहेब वाबळे होते तर व्हा.चेअरमन पदासाठी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांच्या मातोश्री सौ. वर्षाताई विठ्ठलराव वाबळे यांचा एकमात्र अर्ज दाखल झाला यांना सूचक म्हणुन भगवान कुरुमकर व सूचक म्हणुन नितीन रासकर हे होते.
यावेळी संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने दोन्ही अर्जना सहमती दर्शवत निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा केला यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांचे सत्कार सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) थोरात साहेब,नागवडे कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे, सरपंच प्रमोद शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, संस्थेचे सचिव दिगंबर धोत्रे यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या यावेळी उपसरपंच राहुल साळवे, संस्थेचे संचालक भिमराव फरकांडे,काकासाहेब मांडे, अशोक शिंदे, वसंत साळवे, दत्तात्रय झुंजरुक,सौ सुमन मानसिंग मांडे, मा चेअरमन पंडित वाबळे, रावसाहेब जाधव, हनुमंत झिटे, साहेबराव मांडे, विठ्ठलराव वाबळे, बाळासाहेब काकडे, मानसिंग मांडे, नवनाथ उंडे, लालासाहेब गोरे, बाबा फापाळे, राजकुमार उंडे, निलेश गोरे, बापूराव मांडे, महेंद्र उंडे, रोहित उंडे, जयदीप उंडे, राजू ननावरे,जालिंदर कुरुमकर आदी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन मुंडे साहेब यांनी काम पाहिले.
नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे लोकनियुक्त सरपंच प्रमोदजी शिंदे उपसरपंच राहुल साळवे यांनी अभिनंदन केले आहे
वाचक क्रमांक :