By : Polticalface Team ,14-02-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका मा.सौ. अनुराधाताई राजेंद्रदादा नागवडे यांची अहमदनगर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्तीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नामदार श्री. अजित दादा पवार साहेब व महाराष्ट्र राज्य महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचे शुभ हस्ते सौ. नागवडे यांना देण्यात आले. सदर प्रसंगी राज्य मार्केट कमिटी महासंघाचे सभापती मा. श्री. बाळासाहेब नहाटा, अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री. प्रशांतजी गायकवाड, श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.श्री. शरद दादा नवले आदी मान्यवर उपस्थित होते. मा.सौ. अनुराधाताई नागवडे यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून सौ नागवडे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे