मढेवडगाव सेवा संस्थेच्या नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांचा नागवडेंकडून सन्मान
By : Polticalface Team ,16-02-2024
लिंपणगाव प्रतिनिधी श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मढेवडगांव सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी श्री. प्रकाश मारुती उंडे व व्हाईस चेअरमन पदी सौ.वर्षाताई विठ्ठलराव वाबळे यांची निवड झाली या प्रित्यर्थ सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांच्या वांगदरी येथील निवासस्थानी नागवडे परिवाराच्या वतीने जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे व नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात करत नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी मढेवडगावचे लोकनियुक्त सरपंच, प्रमोद शिंदे, उपसरपंच राहुल साळवे यांच्यासह व सर्व ग्रामपंचायत सदस्य व तसेच सेवा सोसायटीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित.
वाचक क्रमांक :