व्यंकनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा
By : Polticalface Team ,16-02-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य व तज्ञ योगअभ्यासक श्री दत्तात्रेय सस्ते यांनी स्वतः सूर्यनमस्काराचे विविध प्रात्यक्षिक करत विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार दिनाचे महत्त्व पटवून दिले. दरम्यान विद्यालयाच्या सर्वच विद्यार्थ्यांनी या सूर्यनमस्काराचे अगदी मनसोक्तपणे सहभाग नोंदवून प्रात्यक्षिके केली.
यावेळी विद्यालयाचे पाचवी ते बारावीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांनी या सूर्यनमस्कार दिनाचे प्रकार प्राचार्यां समवेत अंगीकारले. प्राचार्य दत्तात्रय सस्ते यावेळी बोलताना म्हणाले की, शालेय जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने नियमितपणे योगासने व त्याचे विविध प्रकार तसेच सूर्यनमस्कार या प्रात्यक्षिकांमधून शारीरिक व्यायाम होऊन शरीर, मन, प्रसन्न किंबहुना प्रफुल्लित व तंदुरुस्त राहते. अशी प्रात्यक्षिके केल्यानंतर प्रत्येकाचे असणारे विविध आजारांपासून मुक्तता होते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी सकाळी उठल्यानंतर सूर्यनमस्कारांसारखे प्रात्यक्षिके करून जीवन निश्चितच आनंदी निरोगी ठेवावे. त्यातून आयुष्य मर्यादा देखील वाढले जाते. त्यामुळे प्रत्येकाने योगासने बरोबरच नेहमीच शारीरिक व्यायाम करणे तितकेच महत्त्वाचे आहे. असे प्राचार्य श्री सस्ते यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.
दरम्यान शुक्रवारी सकाळी आठ वाजता या विद्यालयांमध्ये अतिशय शांततेच्या व प्रसन्न वातावरणामध्ये सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील या सूर्यनमस्कार दिनाचा मनुष्यक्त आनंद घेतला. या कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात आला. सूत्रसंचालन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री संतोष शिंदे यांनी केले. आभार ज्येष्ठ शिक्षक अविनाश कांबळे यांनी मानले.
वाचक क्रमांक :