प्राथमिक शाळा दक्षिण हिरवे वाडी शाळेमध्ये बाल गोपाळांचा आनंदी बाजार उत्साहात संपन्न
By : Polticalface Team ,17-02-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- आज दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दक्षिण हिरवे वाडी केंद्र बेलवंडी बुद्रुक या शाळेमध्ये बालगोपाळांचा आनंदी बाजार भरवण्यात आला यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन फळे भाजीपाला विविध खाद्यपदार्थ यांची विक्री केली या विक्रीतून त्यांना दैनंदिन व्यवहार ज्ञान करावे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा विद्यार्थ्यांना व्यवसायिक कौशल्याचे ज्ञान व्हावे शाळेच्या चार भिंती सोडून अनौपचारिक व्यवहारिक ज्ञान मिळवण्याच्या हेतूने हा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता शाळेचे मुख्याध्यापक श्री देवकाते सर व सहशिक्षिका श्रीमती जाधव मॅडम यांच्या प्रयत्नातून आणि संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने हा आनंद बाजार भरवण्यात आला. याप्रसंगी महिला पालक वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वाचक क्रमांक :