By : Polticalface Team ,19-02-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी)- स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा वसा आणि वारसा घेऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस अनुसरूनच सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याकरिता कटिबद्ध रहाणार असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका तथा राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सौ. अनुराधा नागवडे यांनी केले आहे.
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखाना कार्यस्थळावर प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कारखान्याच्या सेवकांच्या वतीने सौ. अनुराधा नागवडे यांची अहमदनगर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागवडे कारखान्याच्या सर्व सेवकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी सौ नागवडे बोलत होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी जशी रयतेची काळजी घेतली त्यांच्या सुखा दुखात अहोरात्र सहभागी झाले. शेतकरी, कष्टकरी, कामगार दिनदलीत व उपेक्षितांची दखल महाराजांनी घेतली. तोच विचार व आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांनी आयुष्यातील सहा दशक अतिशय समर्पित भावनेने तालुक्यातील जनतेची सेवा करून तालुक्याला समृद्ध करण्याकरिता मोठे योगदान दिलेले आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध रहाणार आहोत अशी ग्वाही सौ. नागवडे यांनी दिली.
सौ. नागवडे यांची अहमदनगर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कारखाना सेवकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, संचालक सुभाष काका शिंदे, श्रीनिवास घाडगे, राकेश पाचपुते, योगेश भोईटे, प्रशांत दरेकर, भाऊसाहेब नेटके, विठ्ठल जंगले, लक्ष्मण रायकर, भाऊसाहेब बरकडे, भीमराव लबडे, संचालिका सौ. मेघा औटी यांच्यासह कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक सतीश जांभळे, सर्व खाते प्रमुख विभाग प्रमुख व कामगार व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाऊसाहेब बांदल यांनी सुत्रसंचलन व प्रास्ताविक केले तर सांस्कृतिक मंडळाचे सेक्रेटरी बाळासाहेब लगड यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक :