श्री व्यंकनाथ विद्यालयांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

By : Polticalface Team ,19-02-2024

श्री व्यंकनाथ विद्यालयांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

    लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री व्यंकनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते हे होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमस्थळी इयत्ता सहावीचा विद्यार्थी प्रथमेश जठार या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे हुबेहूब वेशभूषण धारण करून कार्यक्रम स्थळी शिवराय दाखल झाले. त्यामुळे या कार्यक्रमात छत्रपती शिवराय प्रकट झाल्याचे सर्वांनाच जाणवले, हे एक कार्यक्रमाचे मोठे आकर्षण ठरले गेले.


        याप्रसंगी कुमारी वैभवी जगताप, कार्तिक काकडे, कुमारी अनुश्री जठार, ऋतुजा कांडेकर, गीतांजली कापसे, ओम जठार, कृष्णप्रेम मडके तसेच विद्यार्थी पालक विकास जठार आदींनी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर अशी माहिती विशद केली.


         यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ शिक्षक अविनाश कांबळे यावेळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्लॅनिंग करून अनेक लढाई जिंकली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील आपल्या शालेय जीवनात अभ्यास करताना प्लॅनिंगनेच अभ्यासात सुसूत्रता आणावी, समोर कितीही संकटे आली तरी कमबॅक करता आले पाहिजे हे धाडस छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होते त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल ठेवावी असे गौरवदगार श्री कांबळे यांनी यावेळी काढले.


        अध्यक्षीय भाषणात प्राचार्य दत्तात्रय सस्ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जगण्याचे साधन आहेत. भगवान श्रीकृष्णाची रास घेऊनच राजे जन्माला आले. त्यांची श्रीकृष्ण भगवंतावर अपार श्रद्धा होती. विद्यार्थ्यांनी देखील अभ्यासाबरोबर भगवंताचे देखील नामस्मरण डोळ्यासमोर ठेवावे निश्चितपणे सदविवेक बुद्धी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले.


          कार्यक्रम स्थळी विद्यालयाचे कलाशिक्षक अभिषेक उदमले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर पांढऱ्या स्केच बोर्डवर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्केचचित्र अगदी साडेतीन मिनिटांमध्येच रेखाटून आपली अंगी असलेली कला विद्यार्थ्यांसाठी ही एक अनोखी कला प्रेरणादायी व मोठे आकर्षण ठरले गेले.


         या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेतील जेष्ठ कलाशिक्षक सुनील दरेकर यांच्यासह विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उपशिक्षक ज्ञानदेव धायगुडे यांनी केले. आभार शिक्षक संतोष शिंदे यांनी मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी