By : Polticalface Team ,19-02-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- लोणी व्यंकनाथ मध्ये पांरपारिक कलागुण जोपासत शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी विविध क्रार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये राज्य राखीव बल नानवीज प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी नी पांरपारिक लेझीम खेळाचे अतिशय सुरेख सादरीकरण केले तसेच जिल्हा परिषद शाळा मडकेवाडीच्या चिमुकल्यांनी झांज पथकाच्या सहाय्याने आपल्या कलेची झलक दाखवत उपस्थितांची मने जिंकली.
शिवजन्मोत्सवानिमित्ताने लोणी व्यंकनाथ ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यांचे उद्धघाटन व शिवप्रतीमेचे पुजन श्री रामचंद्र केंडे साहेब पोलीस अधीक्षक राज्य राखीव बल प्रशिक्षण केंद्र नानवीज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मनिषाताई नाहाटा सरपंच ,चंद्रकांत गवळी पोलिस निरीक्षक, गणपतराव काकडे, मा उपसभापती, सुनिल पाटील संचालक श्री छत्रपती शिवाजी महाराज खरेदी विक्री संघ,डि आर काकडे, संचालक नागवडे कारखाना,मनेष पाटील जगताप का पोलीस पाटील आदीसह शिवप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भास्कर कुदांडे, आत्माराम नगरे, राहुल गोरखे, बंडू काकडे, महादेव पवार, अभि धाकड ,संकेत इथापे यांच्या सह अनेक तरूण शिवप्रेमीनी प्ररिश्रम घेतले
वाचक क्रमांक :