By : Polticalface Team ,19-02-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)-- येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी विविध स्पर्धात नेहमीच चमकदार कामगिरी करत असतात. यावर्षी ठाणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शीकई मार्शल आर्ट स्पर्धेत विद्यालयाच्या खेळाडूंनी सुवर्णपदकांची कमाई करून विद्यालयाच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला.
दिनांक १३ते १४ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या स्पर्धांमध्ये विद्यालयाचा विद्यार्थी रोहित गोपीनाथ गायकवाड याने सुवर्णपदक तर समर्थ चंद्रकांत राने यांनी रोप्यपदक व गणेश शंकर दिघे या ने कास्यपदक मिळवत राज्यस्तरावर उत्तुंग कामगिरी केली.
खेळाडूंच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने मा.प्राचार्य पंडितराव घोंगडे, प्र .पर्यवेक्षक श्री सुनील शिंदे व सर्व शिक्षकांच्यावतीने बुके देऊन सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक चंद्रकांत राहिंज सर यांचे मार्गदर्शन लाभले .तसेच विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री दत्तात्रय दळवी तालुका क्रीडा समितीचे सचिव हरिश्चंद्र शिंदे, गोरख घोडे, व प्रा.फटे आदींनी मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल राज्याचे मा. मंत्री तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री बबनरावजी दादा पाचपुते , स्कूल कमिटीचे सदस्य भगवानरावआबा पाचपुते, अरुणराव तात्या पाचपुते , बाळासाहेब आप्पा राहिंज व काष्टी गावचे लोकनियुक्त सरपंच श्री .साजन भैय्या पाचपुते, काष्टी सोसायटीचे चेअरमन राकेश भाऊ पाचपुते आदींनी अभिनंदन केले आहे.
त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ,माता पालक ,शिक्षक पालक संघाचे सर्व सदस्य ,सर्व विद्यार्थी ,ग्रामस्थ सर्व सेवक आदींनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचक क्रमांक :