By : Polticalface Team ,21-02-2024
दौंड (प्रतिनिधी) दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी मधील अर्थकेम लॅबोरेटरी कंपनी त्यामध्ये पुणे पोलिसांच्या तब्बल दहा गाड्या या ठिकाणी दाखल होऊन या कंपनीची झाडाझडती घेतली असता तब्बल अकराशे कोटी रुपयाचे सहाशे किलो ड्रग्स मिळून आले आहे, सोमवारी पुण्यामध्ये दोन कोटी रुपयाचे पकडण्यात आले होते, याप्रकरणी अनुक्रमे विकी वैभव माने, अजय करोसिया, हैदर शेख यांना अटक करून कसून चौकशी केली असता ट्रक बाबत कुरकुंभ कनेक्शन सिद्ध झाल्यामुळे पुणे पोलीस व दौंड पोलिसांनी या कंपनीवर छापा टाकून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे, कुरकुंभ एमायडिसी ही केमिकल झोन असून सातत्याने याबाबत कारवाई होत आल्या आहेत, अर्थ केम लॅबोरेटरी या कंपनीला सेल लावण्यात आले आहे , या प्रकरणामागे मोठे गेंडे असल्याची शक्यता नाकारता येत नाही